नपा सफाई कर्मचारी, रुग्णालयातील सफाई कामगार, शहरातील दिव्यांगास       रामदास पाटील सुमठाणकर परिवाराच्या  वतीने २३० किट वाटप                  सफाई कर्मचाऱ्यावर केली पुष्पवृष्टी

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदीप  पिल्लेवाड

मुखेड शहराचे आरोग्य चांगले ठेवण्यात व मुखेडात कोरोनाचा एकही रुग्ण येऊ न देण्यास सफाई कर्मचातऱ्यासोबत रुग्णालयात सफाई कामगारांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कामास प्रोत्साहन मिळावे यासाठी नपातील ९० सफाई कर्मचाऱ्यायास व परिचारीका दिनाचे औचित्य साधुन रुग्णालयातील ३० सफाई कामगारास व  शहरातील ११० दिव्यांगास रामदास पाटील सुमठाणकर परिवाराच्या वतीने दि. १२ रोजी धान्य किट वाटप करण्यात आले.

यावेळी तहसिलदार काशिनाथ पाटील, भाजपा जेष्ठ नेते त्र्यंबक सोनटक्के, डॉ. अशोक कौरवार, दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्षा सौ. अर्चना बियाणी, नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, शाम एमेकर, शिक्षक दिपक लोहबंदे, मैनोदीन शेख, नपाचे बलभिम शेंडगे, अमीर शेख, उमाकांत डांगे, राम सावळेश्वर ,पत्रकार ज्ञानेश्वर डोईजड, संजय  वाघमारे,  विष्णु बियाणी, आदि बनसोडे,जयप्रकाश कानगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरानाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन होऊन दीड महिना  झाला  असून  अनेक नागरीकावर आता उपासमारीची वेळ येत आहे तशी अनेक दिव्यांग बांधवावरही मोठे संकट कोसळले आहे. घरातही दुर्लक्षित अन समाजातही दुर्लक्षित अन काम ही करता येत नाही अशा मुखेड शहरातील ११० दिव्यांगास  एक मायेचा आधार देत धान्य किट वाटप  करण्यात  आले .

रामदास पाटील मित्र परिवाराच्या वतीने संपुर्ण तालुक्यात धान्य किट वाटपाचे काम चालु असुन यामुळे अनेक गरजु गरीब कुटुंबांना आधार मिळालेला आहे. याअगोदर शहरातील व तालुक्यातील विविध समाजीतील वंचित नागरीकांना धान्य किट देण्यात आले असुन रामदास पाटील हे हिंगोलीचे मुख्याधिकारी आहेत. मुखेडमध्ये एक सामाजिक बांधीलकी म्हणुन कोरोनाच्या संकट काळात निस्वार्थपणे त्यांनी हाती काम घेतले आहे.

या वाटपात संदिप पिल्लेवाड, सतिष कानगुले, सचिन पवार, संजय कांबळे, मारोती घाटे, योगेश पाळेकर, नितिन टोकलवाड,आकाश पोतदार, श्रीकांत घोगरे, संदिप पोफळे, प्रमोद मदारीवाले, वैभव सावरगावे, गजानन पांचाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.