मुखेडात लॉकडाऊनमध्ये जत्रेचे स्वरुप ; कोरोनामुळे जगणे महाग अन मरणे स्वस्त .. प्रशासनाचे हातावर हात नांदेडमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसताना कडक तर असताना खुलमखुल्ला…

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

नांदेड जिल्हयात कोरोनाचे रुग्ण 50 च्या वर गेले असताना मुखेडात मात्र लॉकडाऊनची ऐशी कि तैशी म्हणत सर्रास नागरीक फिरत असुन काहींनी आपली दुकाने सुध्दा उघडली आहेत तर सध्या पाहता मुखेडात यात्रेचे स्वरुपच आल्याचे चित्र आहे.

शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंन्ट्रल बॅेंक ऑफ इंडिया, नांदेड जिल्हा मध्यवती बँक अशा बँकेत केंद्राने दिलेले पाचशे व दुष्काळ निधी आलेला दोन हजार व विविध योजनेची रक्कम उचलण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यात सोशल डिस्टन्सींग कुठेही दिसत नाही.

प्रशासनाने वारंवार सांगुनही काही ठिकाणी सर्रास दुकाने चालु असुन पोलिसांची गाडी आल्यास दुकाने बंद व गाडी केल्यास दुकाने चालु करण्याचा प्रकार वाढल्याने नागरीकही बाजारपेठेत येत आहेत. तर अनेक दुकानदार दुकानाच्या समोरच बसुन राहत आहेत. अशामुळे नांदेड शहरातील कोरोना तालुक्यापर्यंत पोहचायला वेळ लागणर नाही हेही तितकेच खरे.

शहरातील मोंढा भागात सर्वच दुकाने खुली असुन यामुळे तिथेही बाजारपेठेचे स्वरुप आले असुन बहुतांश दुकानदाराला मास्क नाही व दुकानातील नोकरदारासही मास्क नाहीत गर्दीमुळे हा धोका वाढला असुन प्रशासनाने काळजी नाही घेतल्यास याचा धोका मुखेड तालुक्याला नक्कीच होणार असल्याचे दिसत आहे. पण जगणे महाग अन मरणे स्वस्त झाल्याची परिस्थिती सध्या तरी आहे.