नांदेडमध्ये बारदाना व प्लास्टिकच्या गोडाऊनला आग

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

नांदेड  वैजनाथ स्वामी

रात्री 12 च्या सुमारास   हैद्राबाद रोड चंदासिंग कॉर्नर जवळ 1. निलेश इन्ड्रस्टिज ,, निलेश रान्जीभाई 2. जानकी ट्रेडिंग कंपनी 3. तुलसीदास कंपनी यांच्या बारदाना व प्लास्टिक च्या गोडाऊन ला आग लागली .

 

तीन मनपा अग्निशमन वाहनांच्या , 1 एम. आय. डी.सी अग्निशमन वाहन व १४००० लिटरचे चार पाण्याच्या टेंकर च्या साह्याने आग आटोक्यात आणली आहे .

आग आटोक्यात आणण्यासाठी पाच ते सहा तास लागले कारण गोडाऊन मधे मोठ्या प्रमाणात खतांच्या रिकाम्या प्लास्टिकच्या बैगचे गठाने होते व चार गोडाऊन मधे बारदानाचा साठा होता. कोणतीही जिवीत हानी झाली नाही.