वळंकीतील तरूणानं घडवलं माणुसकीच दर्शन; कुरळा येथील त्या दिव्यांग परिवाला केली पाच हजार रूपयाची आर्थिक मदत…

नांदेड जिल्हा मुखेड

बाराहाळी: पवन कँदरकुंठे

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून देशात दिड महिन्यापासून लॉकडाऊन केल्यामुळे अनेक गरीब कुटुंबाना अन्न, धान्याचा प्रश्न उभा टाकल्यामुळे अनेकांना या लॉकडाऊनमुळे बाहेर कुठे जाताही येत नाही. त्यामुळे अनेक कुटुंबाना ऊपासमारी वेळ आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, कुरूळा येथील गंगाधर चोपवाड असे एक परिवार आहे त्यांना तीन अपत्य आहेत त्यातील दोन मुले अपंग व एक दिव्यांग आहे. त्यांना व्यवस्थीत चालता येत नाही डोळ्यांना दिसत नाही अशा रोजमजुरी करणार्या त्या परिवारावर ऊपासमारीची वेळ आली आहे.

राजकीय पुढारी आणी प्रशासनाकडुन कोणतीच मदत त्या परिवाराला मिळाली नसुन ही बातमी एका सर्वसामान्य कुटुंबातील मुखेड तालुक्यातील वळंकी येथील माधव गोजेगावे यांना कळाली असता त्यांना त्या अपंग व दिव्यांग कुटुंबाला मदत करण्याची त्यांची तिव्र ईच्छा झाली आणी त्यांनी पाच हजार रूपयाची आर्थिक मदत केली. अशी ही मदत करून त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे.


मी गेली अनेक वर्षे तेलंगना राज्यातील हैद्राबाद येथे एका आँईल कंपनीमध्ये काम करतो मला गरीबीची खुप मोठी जाणीव आहे. गरीबी काय असते हे मी खुप जवळुन पाहिलोय. मला त्या दिव्यांग व अपंग कुटुंबातील मुला-मुलीची बातमी वर्तमानपत्रे व टि.व्ही.चँनलच्या माध्यमातुन कळताच त्या कुटुंबाला मला मदत करण्याची ईच्छा झाली आणी मी त्यांच्याशी संपर्क करून थेट त्यांच्या बँक खात्यावर पाच हजार रूपये पाठवुन मदत केली.

माधव बाबुराव गोजेगावे
रा.वळंकी ता.मुखेड