नायगांव सि सि आय कापुस खरेदी केंद्रात शेतकर्‍यांची लूट थांबवा अन्यथा कापूस मुखेड तहसील कार्यालयात आणणार – बालाजी पाटील ढोसणे

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन क्यादरकुुंटे

मुखेड तालुक्यातील शेतकरी अगोदरच कोरोना लाॅकडाऊनमुळे मेटाकुटीला आला असताना त्यात शेतात पिकविलेला कापुस विक्री मुखेडसह ईतर चार तालुक्याला नायगांव जिनिंग हे शासनाने खरेदी केंद्र दिल्यामुळे तिथे तालुक्यातील शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात लुट होत असुन याकडे प्रशासन डोळेझाक पणा करत असल्याचे दिसुन येत आहे .

नायगांव तालुक्यातील खरेदी केंद्रावर मुखेड तालुक्यातील शेतकर्‍यांना सवतीची वागणुक मिळत असल्याने तात्काळ याकडे प्रशासनाने लक्ष देवुन मुखेड तालुक्यातील अधिकार्‍यांची कापुस खरेदीसाठी नेमणुक करावी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा यापुढे तालुक्यातील शेतकर्‍यांचा कापुस तहसील मध्ये आणु असा इशारा शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांनी जिल्हाधिकारी यांना ईमेलच्या माध्यमातुन दिला आहे.

मुखेड तालुक्यातील शेतकर्‍यांना गुगल लिंकच्या माध्यमातुन आँनलाईन कापुस खरेदी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.त्यानुसार शेतकर्‍यांना एसएमएस द्वारे कापुस विक्री साठी मार्केट कमिटीला बोलावत असुन तिथे त्याना दोन प्रतित कागदपञे मागवुन पुन्हा त्या शेतकर्‍याला एसएमएस पाठवुन मार्केट कमिटीची आँनलाईन पहचानपञ घेवुन जिनिंगला जावे लागत असुन यात शेतकर्‍यांची मोठी गैरसोय हौत असुन मार्केट कमिटी व जिंनिंग एक किमिचे अंतर शेतकर्‍यांना वाहनसुविधा नसल्याने चालत पार करावे लागत असुन ति गैरसोय थांबविण्यासाठी सिसिआय चे आँफीस कापुस खरेदी होईपर्यत जिनिंग परीसरात चालु करावे अशी मागणीही ढोसणे यांनी केली.

सिसिआयला एफएक्यु दर्जाचा कापुस असला तरी पण राज्यस्थानी ग्रेडर व तेथील जिंनिंग मालकाच्या स्थानिक माणुस कापुस प्रति क्विंटल मागे 4 ते 5 किलो कट्टी व 12 ते 14 प्रमाण कुठलीही मशीनने न तपासता स्वताच्या मर्जीनुसार लावुन चांगल्या असणार्‍या कापसाला पण कमी भाव जास्त प्रमाणात कट्टी लावुन लुट करत असल्याचे दिसुन येत असुन त्यांच्या मर्जीतल्या जिनिंग मालकाच्या मतदारसंघातल्या लोकांना विशेष भाव मिळत असल्याचे दिसत आहे. तेथील कापुस तपासणारे हे राज्यस्थानी असल्याने त्यांना शेतकरी बोललेली मराठी भाषा समजत नसुन शेतकर्‍यांना त्यांनी बोललेली हिंदी समजत नाही याकडेही प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे व बर्‍याच शेतकर्‍याना 6 ते 18 नंबर काय आहे हेच माहीती नसुन दुसर्‍या वेचणीच्या कापसाठी दर निश्चीत नसल्याने त्या कापसातही शेतकर्‍यांची फसवणुक होत असुन जिनिंग नायगांव तालुक्यातील पुढार्‍यांची असल्याने मुखेड तालुक्यातील शेतकर्‍यांचा तिथे कुणीच वाली राहीला नसुन काही विचारले त्या शेतकर्‍यांचा कापुस परत पाठविण्याचे प्रकार झाल्याने कोणता शेतकरी पुढे येवुन तक्रार करण्यास धजावत नसुन या कापुस खरेदी जिनिंग मनमानी प्रकरणाकडे जिल्हाधिकारी डाॅ.विपिन इटाणकर साहेबांनी विशेष लक्ष देवुन जगाचा पोशिंदा असणार्‍या शेतकर्‍यांची होणारी लुट थांबवावी अशी मागणी शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांनी केली आहे.