स्वस्त धान्य दुकानदाराचा राशन वाटपात अनियमीतता… पावती न देता नियमापेक्षा जास्तीचे पैसे आकरल्याचा गावकऱ्यांचा आरोप

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड  : पवन  क्यादरकुंटे

तालुक्यातील रावी येथील स्वस्तधान्य दुकान चालक ग्यानोबा मारोती तोत्रे हे लाभार्थ्याना देण्यात येणाऱ्या माल वाटपात अनियमीतता व पावती न देता नियमापेक्षा जास्तीचे पैसे घेऊन माल देत लाभार्थ्याची आर्थिक लुट करीत असल्याने याची चौकशी करण्याची मागणी तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

ज्यांचे पोट हातावर चालते व इतर गरीब,गरजु कुटुंबाना सन्मानाने जगता यावे म्हणून शासन अल्पदरात स्वस्तधान्य चालकाव्दारे राशनचा माल पुरवठा केला जातो.पण मुखेड तालुक्यातील रावी येथील स्वस्त धान्य दुकान क्र.१८९चालक ग्यानोबा तोत्रे हे माल वाटपात अनियमीतता व पावती न देता नियमापेक्षा जास्त पेसे घेऊन राशन माल देऊन लाभार्थ्यांची आर्थिक लुठ करीत असल्याने नागरिकांनी स्वस्तधान्य चालकाला जास्तीचे पैसे का घेता.नियमानुसार पैसे घ्यावे असे विचारपुस केली असता आम्हाला परवडत नाही तुम्हाला काय चौकशी करायची आहे ते तहसीलला करा असे उडवा उडवीचे उत्तर देत शिधाधारकांना अडचणीत आणत आहे.

अनेकदा याविषयी रहिवाशीनी तालुका पुरवठा विभागाला कल्पना देऊन देखील आम्हाला न्याय भेटत नाही.यामुळे शिधा धारकानी स्वस्त धान्य दुकान चालकाचा मनमानी कारभाराचा पाडाच तहसीलदार यांच्या पुढे वाचुन याची तात्काळ चौकशी करुण कारवाई करण्याची मागणी तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.यावर मारोती वाडीकर,नरशींग करगळे,मारोती व्यंकट वाडीकरसह आदीचे स्वाक्षरी आहेत. यावेळी तलाठी ज्ञानेश्वर रातोळीकर यांची उपस्थिती होती.