मुखेडमधील चर्मकार बांधवांना रामदास पाटील मित्र परिवाराच्या वतीने किराणा धान्य वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन  क्यादरकुंटे

कारोनामुळे अनेकांचे संसार उघडयावर आले आहेत. अनेकांच्या हातची कामे गेली असुन अनेक परिवारावर उपासमारीची वेळ सुध्दा आलेली आहे. समाजात अनेक दानशुर व्यक्ती आहेत जे की प्रशासनासोबत त्यांचेही मोठे योगदान आहे.

मुखेड मधील चर्मकार बांधवांनाही मोठया संकटाला सामोरे जावे लागत आहे. हाताला काम नाही, मोठा उद्योग नाही कोरानामुळे एक महिण्याच्यावर घरातच अडकून पडलेले….व्यवसाय असा की रोज करावे तेंव्हा कुटुंबाचा गाडा चाले….. याच परिस्थितीची दखल घेत रामदास पाटील मित्र परिवाराच्या वतीने चर्मकार बांधवांना किराणा धान्य किट देऊन एक छोटासा मदतीचा हात दिला आहे. अनेक बांधव गोर गरीब असुन प्रशासनानेही याकडे लक्ष देऊन त्यांना मदतीचा हात दयावा अशी मागणी चर्मकार बांधवाकडून होत आहे. या छोटयाशा मदतीमुळे अनेकांना आधार मिळाला आहे.

यावेळी चर्मकार समाजाचे युवा नेते संजय वाघमारे यांच्यासह , अपक्ष नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, ज्ञाने·ार डोईजड, योगेश पाळेकर, नितिन टोकलवाड आदी उपस्थित होते.