सौ.सुमनबाई नल्लावार यांचे निधन 

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : प्रतिनिधी

मुखेड येथील ज्येष्ठ महिला सौ. सुमनबाई राजेंद्रराव नल्लावर (वय 70 वर्ष) यांचे बुधवारी दि. 6 रोजी सायंकाळी चार वाजता हृदयविकाराच्या झटक्यामुळे मुखेड येथे निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दि. 7 रोजी मोतीनाला स्मशानभूमी येथे सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मुखेडचे  व्यापारी अशोक मडगुलवार व कांग्रेसचे शहराध्यक्ष नंदकूमार मडगूलवार यांच्या मामी होत. सेवानिवृत्त ग्रामसेवक राजेंद्र नल्लावार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात  तीन मुले,  दोन मुली,नातवंडे असा मोठा परीवार आहे. संतोष नल्लावार,

सचीन नल्लावार,डाॅ.किरण नल्लावार पुणे यांच्या मातोश्री होत. या निधनाबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.