मुखेडच्या शासकीय गोदाम हमालदारांना ना मास्क ना सॅनिटायझर ना हँडग्लोज … मुखेड तहसिल प्रशासनाचा अजब गजब कारभार

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदिप पिल्लेवाड

मुखेड शहरातील मध्यठिकाणी पंचायत समितीच्या बाजुस असलेल्या शासकीय गोदामामध्ये राशन दुकानाचे अन्न पुरवठा करण्यासाठी एकुण ९ हमालदार तेथे काम करतात पण तेथील हमालदारांना प्रशासनाकडुन मास्क, सॅनिटायझर व हँडग्लोज अद्याप मिळाले नाही.

सध्या देशातच नव्हे तर संपुर्ण जगात कोरोना विषाणुने हाहाकार माजवला असुन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  तिसरा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. भारतात प्रतिदीन २००० च्या वर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शासन विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे पण मुखेड तहसिल प्रशासनात मात्र याबाबत काहीच गांभीर्य दिसत नसल्याचे चित्र आहे.

शासकीय गोदाम येथुन पुर्ण मुखेड तालुक्यातील जनतेला अन्नधान्य पुरवठा केला जातो पण तेथील कामगारांनाच प्रशासनाच्या वतीने अद्याप सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोज देण्यात आले नसल्याने तेथील हमालदारांने नाराजी व्यक्त केली आहे.

मुखेडचे शासकीय गोदाम हे समस्येचे माहेरघर बनले असुन तेथे मागील २० वर्षापासुन लाईटची व्यवस्था नाही, गोदामला वाॅचमॅन नाही, हमालांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही व हमालांना काम झाल्यानंतर हात पाय धुण्यासाठी सांडपाण्याची व्यवस्था नाही. गोदामामधुन संपुर्ण तालुक्याला राशन दुकानांमार्फत अन्नधान्य पुरवठा केला जातो त्यामुळे याकडे तहसिल प्रशासन लक्ष देईल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


आम्हाला वाली कोण…??
सध्या कोरोनाने संपुर्ण देश परेशान आहे आम्ही आमचा जिव धोक्यात घालुन येथे काम करतो, पण आम्हाला अद्याप तरी मास्क, सॅनिटायझर व हँडग्लोज प्रशासनाने दिलेले नाही व गोदामला पिण्याचे पाणी आणि हातपाय धुण्यासाठी सांडपाण्याची पण व्यवस्था नाही. आम्हाला वाली कोणीही वाली नाही.
        हमालदार शा. गोदाम


आम्ही प्रशासनाकडे वेळोवळी मागणी केलेली आहे पण प्रशासनाकडुन काहीही पुरवठा होत नाही. अद्याप गोदाम हमालदार व कर्मचा-यांना मास्क, सॅनिटायझर व हँडग्लोज देण्यात आले नाहीत
          बी. गिते
              गोदाम कीपर


हमालदारांना एक बार मास्कचे वाटप करण्यात आले आहे. सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोजची मागणी केलेली आहे व बाकीच्या समस्या पण लवकरच सोडवले जातील.

           तहसिलदार काशिनाथ पाटील