नंदकुमार मडगुलवार यांच्याकडून पोलीस व डाॅक्टरांना प्रोटेक्शन मास्क वाटप.

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदीप पिल्लेवाड

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी डॉक्टर्स पोलीस अधिकारी हे जीवापाड मेहनत घेत आहेत, यांना कुठलिही बाधा होवू नये म्हणून काँग्रेसचे शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मडगुलवार यांनी मोफत प्लास्टिक मास्क वाटप केले

संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूच्या व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. या महारोगावर विजय मिळविण्यासाठी संपूर्ण देश लाॅकडाऊनच्या माध्यमातून एकजुटीने लढा देत आहे.

दिवसेंदिवस पोलीस व डॉक्टरांना  सुध्दा कोरोनाची लागणचा होत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान पोलीस अधिकारी व डॉक्टरांचा जनसंपर्क जास्त असतो त्यामुळे त्यांना प्रादूर्भावाची शक्यता जास्त असते त्यामुळे त्यापासून बचाव व्हावा या ऊद्देशाने असे मास्क पुरविण्याची कल्पना नंदकुमार मडगुलवार यांनी राबविली आहे.

पोलीस  उपविभागीय  अधिकारी रमेश  सरवदे, तहसिलदार काशिनाथ पाटील , पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर, पिएसआय भाऊसाहेब मगरे , मुखेडभूषण डॉ  दिलीप  पुंडे यांच्यासह  वैद्यकीय अधिका-यांना कोरोना प्रोटेक्शन मास्क नगराध्यक्ष बाबुराव देबडवार,काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार,दिलीप कोडगिरे,शरद कोडगिरे यांच्या हस्ते देण्यात आले.

याअगोदर ही नंदकुमार मडगुलवार यांनी नगर पालिकेला फवारणी मशीन दिली दिली आहे तसेच शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी सँनिटायझर करण्यासाठी मशीन उभ्या केल्या आहेत, गोरगरीबांना धान्याचे किट वाटप वाटप केले आहेत तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने न्हावी समाजातील गरिब व गरजूंना किटचे वाटप करण्यात आले आहे.अशा संकटसमयी धावून येत असल्याने नंदकुमार मडगुलवार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

यावेळी  विशाल  गायकवाड , शौकत  होनवडजकर, मारोती  घाटे , जयप्रकाश  कानगुळले  यांचीही उपस्थिती  होती .