पेठवडज सर्कलमध्ये रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराच्या वतीने धान्य किट वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

कंधार  : प्रतिनिधी

कंधार  तालुक्यातील पेठवडज येथे गरजू नागरिकांना रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराच्या वतीने जीवनावश्यक धान्य किट वाटप करण्यात  आले .

पेठवडज परिसरात गरीब, वृद्ध आणि अपंग गरजूंच्या प्रत्यक्षात घरी जाऊन ही मदत करण्यात आली. कोरोना मुळे गरीब लोकांचं परिस्थिती बिकट झाली असून पोट कसे भरावे हा प्रश्न उद्धभवत आहे. ही बातमी रामदास पाटील सुमठाणकर यांना कळाली असता त्यांनी युवकांना योग्य त्या सूचना देऊन मदतीची सोय केली.

 

यावेळी संदीप केंद्रे यांच्यासह योगेश पांचाळ, राजू मनस्करगे, सुमित पाटील, किशन पांचाळ, ज्ञानेश्वर जाधव, शिवहार नखाते, नारायण पाटील, कैलास बेलाडे, आंनद शिरवंदे, ओम वाडीकर, साई वाघमारे, प्रल्हाद गंगोत्री, विठ्ठल डावकोरे आणि परिसरातील रामदास पाटील सुमठाणकर मित्रपरिवाराचे सदस्य उपस्थित होते..

 

पेठवडज सर्कल मधील प्रसिद्ध व्यापारी सुनील शेठ केंद्रे यांनी सामाजिक भान जपून योग्य दरात किट बनवून त्यांनीही मदत  केली .