कोरोना रुग्णात वाढ ; नांदेडमध्ये आणखी तीन पॉझिटिव्ह आढळले ! – रूग्ण संख्या २९, मृत्यू २

ठळक घडामोडी नांदेडच्या बातम्या

नांदेड : दि.१ मे २०२० रोजी तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी ३ नमुने Corona Positive असल्याचा अहवाल आलेला आहे

त्यापैकी दोन रुग्ण पंजाब येथून परतलेले आहेत. ते शासकीय आयुर्वेद रूग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत.

व एक रुग्ण खाजगी रूग्णालयात दाखल आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली. नांदेडमध्ये रुग्णांची संख्या आता २९ झाली असून यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

 

नांदेड मध्ये कोरोना रुग्णाची वाढती संख्या धोकादायक असून नागरिकांनी विनाकारण बाहेर न पडता घरातच राहावे असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे .