रानडुकराच्या हल्यात सात वर्षाचा मुलास जबर दुखापत

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदीप  पिल्लेवाड

मुखेड तालुक्यातील बेरळी खु. येथील सात वर्षाच्या मुलास रानडुकराने केलेल्या हल्यात जबर दुखाप झाली आहे.

तालुक्यातील बेरळी खु. येथील रामदास भंडारे यांचा मुलगा रितेश भंडारे हा घराबाहेर खेळत असताना अचानक रानडुकर आने व त्याच्या मांडीला चावा घेऊन हल्ला केला त्या हल्यात मुलास जबर दुखापत झाली असुन मुलास मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता दुखापत जबर असल्याने नांदेड येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी त्यास दाखल करण्यात आले.

तसेच शेजारी असणाऱ्या  अशोक गोणारे यांच्या मुलीसही रानुडकराने हल्ला मरुन जबर दुखापत केली आहे. रामदास भंडारे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देऊन मुलास झालेल्या जबर दुखापतीवर योग्य उपचारासाठी मदत करावी अशी मागणी केली आहे.