लॉकडाऊन असतानाही सर्पमिञाची मोफत सेवा

नांदेड जिल्हा मराठवाडा

मुखेड  : प्रतिनिधी

संपुर्ण जगभरात कोरोना व्हायरस (कोव्हीड 19) या महामारीचे थैमान घातलेले दिसत अाहे.या महामारीपासुन वाचविन्यासाठी उपाय फक्त एकच आहे.घराबाहेर न निघने जो घरामध्ये बसेल तो या कोरोना पासुन वाचेल काही लोक या कोरोनापासुन दुर रहावे म्हनुन ते आपल्यासाठी जिव धोक्यात घालुन कार्य करत आहेत.

त्यात डॉक्टर शासकीय अधीकारी सफाई कामगार पोलीस दल व काही अत्यावश्यक सेवा देनारे संपुर्ण भारत गेले एक ते दिड महिना लॉकडाऊन आहे. अशा परिस्थीतीमध्ये एखाद्याच्या घरी साप निघाल्यावर त्यांचा थरकाप उडतो.व त्यास मारन्याचे धाडस ही होत नाही.संचारबंदी असल्यामुळे जवळचे लोकही जमाव करता येत नाहीत.

म्हनुन ते ताबडतोब सर्पमिञांशी संपर्क करतात. जळकोट तालुक्यातील सर्पमिञ सिध्दार्थ काळे शेलदरकर हे अापला जीव धोक्यात घालुन कोनाच्याही घरामध्ये साप किंवा प्राणी आढळल्यास जळकोट,हाडोळती, कंधार, मुखेड,कुरुळा, जांब, अहमदपूर, या ठिकाणी जाउन घरात निघालेला तो साप पकडून जंगलामध्ये वनविभागाच्या सहाय्याने सोडून देतो.

वन्यजीव रक्षक सेवाभावी संस्था उदगीर अंतर्गत कंधार,मुखेड,जळकोट या तीन तालुक्यातील एकमेव सर्पमिञ सिध्दार्थ काळे शेलदरा हे देशावरील आलेले संकट आर्थिक परिस्थिती पाहून कोठेही साप निघाला की ते विनामुल्य, निस्वार्थी मोफत सेवा देतात सर्पमिञाला गावोगावी जावे लागते म्हणून ते आपल्या बचावा साठी व सुरक्षेसाठी तोंडाला मास्क सेफ्टी गॉगल, हँडग्लोज, सँनिटायझर, हेड कँप, सेफ्टी शुज व साप पकडन्यासाठी सेफ्टी स्टीक टॉम या सर्व सेफ्टी साहित्यासह कॉल करतो
आपल्या परिसरामध्ये घरामध्ये जखमी प्राणी अथवा साप आढळल्यास घाबरून न जाता तात्काळ सर्पमित्राला फोन करा मो नं 9623729438 असे आवाहन सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांनी केले आहे