अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका नांदेड शहरात नव्याने 20 रुग्ण कोरोना बाधित ; आतापर्यंत 26 रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह ; तर 1 हजार 9 जणाचा अहवाल निगेटिव्ह

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड :- श्री गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड परिसरात राहणाऱ्या 97 व्यक्तींचा स्वॅब 30 एप्रिल 2020 ते 1 मे 2020 या कालावधीत घेवून तपासणी चालू असतांना 20 रुग्ण हे कोरोना विषाणुमुळे बाधित असल्याचे आज आढळून आली आहेत. 25 व्यक्तींचा अहवाल हा निगेटिव्ह असून 11 स्वॅब अनिर्णित आहेत. उर्वरित अहवालाची प्रतीक्षा आहे. या व्यक्तींना एनआरआय भवन कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात विषाणू बाधित झालेल्या गुरुद्वार परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात पुर्वीचे 6 आणि नव्याने 20 रुग्णांचे स्वॅब असे एकुण 26 पॉझीटिव्ह आहेत.

कोरोना विषाणु संदर्भात आज शनिवार 2 मे 2020 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात 1 हजार 235 संशयितांची नोंद झाली आहे. यामध्ये जिल्ह्यात कोरोना संशयितांचे घेण्यात आलेले एकूण स्वँब 1 हजार 120 असून त्यापैकी 1 हजार 9 जणांचा अहवाल निगेटिव्ह आहेत तर 65 स्वँबचा अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत 5 जणांच्या स्वँब तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. तसेच 14 जणांचा निष्कर्ष निघालेला नाही. एकुण घेण्यात आलेले स्वँब 1 हजार 120 पैकी आतापर्यंत पूर्वीचे 6 रुग्ण आणि नव्याने आलेले 20 रुग्णाचा स्वँब असे एकुण 26 स्वँब पॉझीटिव्ह आहेत. यापैकी पिरबुऱ्हाणनगर नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील सेलू येथील महिला रुग्णाचा औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नांदेड शहरातील अबचलनगर येथील एका रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल रविवार 26 एप्रिल रोजी प्राप्त झाला होता. या रुग्णाची प्रकृती स्थीर आहे तसेच त्याच्या निकटवर्तीय संपर्कातील 18 व्यक्तींचे स्वँब घेण्यात येवून तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 18 व्यक्तींच्या स्वँब तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे.

श्री गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड येथील भाविकांना पंजाब राज्यापर्यंत वाहन सेवा पुरवणारे ­2 वाहन चालक आणि त्यांचा 1 मदतनीस यांचाही स्वँब अहवाल पॉझीटिव्ह प्राप्त झाला आहे. हे वाहन चालक आणि मदतनीस गुरुवार 23 एप्रिल रोजी पंजाब येथे जाऊन मंगळवार 28 एप्रिल रोजी परत आले असता त्यांना नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्याच्या सिमेवरच अडवून वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे दाखल करण्यात आले होते. या तीन व्यक्तींचे बुधवार 29 एप्रिल 2020 रोजी स्वँब तपासणीसाठी घेण्यात आले होते. सद्यस्थितीत या रुग्णांवर शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

यामधील नांदेड सांगवी येथील रुग्णांचे 4 निकटवर्तीय व्यक्तींना यात्री निवास येथील कोविड केअर सेंटर येथे तर लोहा तालुक्यातील किवळा येथील रुग्णांचे 9 निकटवर्तीय व्यक्तींना कोविड केअर सेंटर लोहा व कंधार तालुका येथे अलगीकरण करण्यात आले असून त्यांची स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.