Saturday, August 08, 2020

नांदेडमध्ये 20 जणांना कोरोनाची बाधा ; नांदेडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 24 वर

ठळक घडामोडी महाराष्ट्र

नांदेड : नांदेडमध्ये 20 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.  शनिवारी सकाळी त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे नांदेडमधील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 24 वर पोहचली आहे.

शनिवारी सकाळी घशातील द्रावाची म्हणजेच स्वॅब गोळा करण्यात आले होते. त्यांची चाचणी करण्यात आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान करण्यात आलं आहे.  यापूर्वी शुक्रवारी  3 जणांना कोरोनाची लागण झाली होती. नांदेडमध्ये आतापर्यंत एकूण 26 कोरोनाचे रुग्ण सापडले असून त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 

पंजाबमध्ये यात्रेकरूंना सोडून आलेल्या चार वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली असताना आता थेट लंगर साहिब  गुरुद्वारा परिसरात कार्यरत असणाऱ्या २० जणांचे अहवाल पाझिटिव्ह आल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.

यात्रेकरूंना सोडून आलेले वाहनचालक कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आल्यानंतर प्रशासनाने उशिरा का होईना लंगर साहिबमधील वेगवेगळ्या लोकांचे ३० एप्रिल व १ में असे लागोपाठ दोन दिवस जवळपास ९७ लोकांचे स्वाब घेतले होते.त्यापैकी २० लोक कोरोनाबाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.शनिवारचा दिवस उजाडला तो ही माहिती घेऊनच.२० जणांना कोरोनाची लागण झाली यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता.पण अधिकृत माहिती समोर आल्यानंतर नांदेडकर हादरून गेले आहे.
दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून सकाळपासून अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.आणखी काही अहवाल येणे बाकी असून त्यात काही जण पाझिटिव्ह आढळून आल्यास ती बाब नांदेडकरांना चिंतेत टाकणारी आहे.
या सर्व कोरोनाबाधित रुग्णांना एनआयआर भवन कोविड केयर सेंटर येथे ठेवण्यात आले असून या भागात संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

error: Content is protected !!