नांदेडकरांनो सावधान ..धक्कादायक ..नांदेडमध्ये आढळला कोरोनाचा तिसरा रुग्ण ..घरीच रहा ..सुरक्षित रहा..

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा
नांदेड : वैजनाथ स्वामी
     जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचे एकुण दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळली होती. नांदेड येथे दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झालेल्या एका ६४ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी सांयकाळी उघडकीस आले. ही महिला सेलूची (परभणी) येथील रहिवासी असून ती नांदेडमध्ये आपल्या दोन मुलांसोबत आली होती अशी माहिती आहे. ती महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर तिच्या दोन्ही मुलांना कारन्टाईन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ही धक्कादायक माहिती हाती आल्याबरोबर जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिका-यांसह कर्मचा-यांची दोन पथके तातडीने बुधवारी रात्री उशिरा सेलूस रवाना केली आहेत. दरम्यान, त्या महिलेच्या कुटुंबियांतील अन्य व्यक्तींची वैद्यकीय तपासणी या पथकाद्वारे केली जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.
सेलू येथील ६० वर्षीय महिला दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्या महिलेवर औरंगाबाद येथील रुग्णालयात  काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. 26 एप्रिल रोजी ती महिला सेलूस आली. दोन दिवस कुटुंबियाबरोबर राहिल्यानंतर तेथून उपचारानिमित्त ती महिला दि.28 एप्रिल रोजी नांदेडला रवाना झाली. तेथील रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरु असतांना तेथील वैद्यकीय अधिका-यांनी कोरोना तपासणी संदर्भात स्वॅब घेतला. त्याचा अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला. तेंव्हा ती महिला कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारानंतर नांदेड जिल्हा प्रशासनाने तातडीने त्या महिलेच्या कुटूंबियांसह परभणी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागास सतर्क केले. पाठोपाठ वैद्यकीय अधिका-यांसह कर्मचा-यांचे एक पथक तातडीने सेलूस रवान झाले. दुसरे पथक रात्री उशिरा पावणे नऊच्या सुमारास सेलूस रवाना झाले आहे.
आतापर्यंत क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या एकुण 1 हजार 20 एवढी आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 291 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 67 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 121 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 899 अशी संख्या आहे. एकुण नमुने तपासणी 899 करण्यात आली. त्यापैकी 791 नमुने निगेटीव्ह आली आहेत. तर नमुने तपासणी अहवाल बाकी 99 जणांचा आहे. नाकारण्यात आलेले नमुने 5 आहेत. काही निष्कर्ष न निघालेला एक आहे.
नांदेड जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 83 हजार 100 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे.