हिंगोली जिल्हा रेड झोनमध्ये दोन कोरोना पॉझिटिव्ह संख्या 16 वर

ठळक घडामोडी मराठवाडा

हिंगोली :जिल्ह्यात कोराना बाधीत रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत चालली आहे. 29 एप्रिल रोजी सकाळी आलेल्या अहवालानुसार वसमत येथे बार्शी इथून आलेला क्वारनटाईन सेंटर मधील 21 वर्षीय तरुण कोव्हिड 19 ची लागण झाली आहे. 25 एप्रिल रोजी मुंबईहून आला होता .त्यामुळे त्याना वसमत येथे क्वारंनटाईन करण्यात आले होते. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या 16 वर पोहोचली आहे.
29 एप्रिल पर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकूण 17 व्यक्तींना कोरोना ची लागण झाली आहे यात एस आर पी एफ हिंगोलीचे 12 जवान व एस आर पी एफ जालना चा एक जवान असे एकूण 13 जवान कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर एस आर पी एफ जालना जवानाच्या संपर्कातील एकाला कोविंड 19 ची लागण झाली आहे. हे सर्व तेरा जण जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वाढ मध्ये भरती आहेत. क्वारंटाईन सेंटर सेनगाव येथील एका पाच वर्षीय बालकाला कोव्हिड-19 लागण झाल्याचा अहवाल 28 एप्रिल च्या सकाळी प्राप्त झाला आहे. जिल्ह्याची संख्या आता 16 वर पोहोचली आहे. यापूर्वी एकाला कोरोनाची बाधा झाली होती तो रुग्ण ठणठणीत बरा होऊन वसमत येथे घरी गेला आहे. या रुग्णाला मिळून जिल्ह्यात एकूण 16 रूग्ण आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्याने रेड झोन मध्ये प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता घरातच राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले आहे