विध्यार्थ्यांच्या मनातील आता धावू दे स्वप्नांची गाडी;म्हणूनच सर्वांगीण विकासासाठी धडपडतेय शाळा पारडी

इतर बातम्या संपादकीय

शिक्षण म्हणजे काय?विद्यार्थी अन शिक्षक,शिक्षक -पालक,शिक्षक-शा व्य समिती, शिक्षक आणि गावकरी यांचे संबंध कसे असावे?हे जाणून घ्यायचे असेल तर नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका ठिकाणापासून अगदी 3 कि मी अंतरावर असलेल्या जि प प्रा शाळा पारडी येथे येऊन जाणून घेता येईल.

शहरालगत असलेल्या या शाळेत इयत्ता पहिलीपासून सातव्या वर्गात एकूण 217 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत न्हवे आपले भविष्य शोधून त्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. शिक्षण म्हणजे विध्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, क्रियाशील विकास हे जाणून घेऊन 29 मे 2018 रोजी शाळेत नव्याने रुजू झालेला शिक्षकवृंद त्यात मु.अ. किसवे एम एल, प्रा.पद.बालाघाटे डी पी,स.शि. कदम जे ए,गंगाखेडकर सी पी, देशमुख जि एल, इंगोले एस एस, कदम आर जी यांनी नियोजनबद्ध पध्दतीने विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा जो संकल्प केला. या नियोजनातून घडत असलेल्या यशाची ही कहाणी… क्रीडा भरारी शाळा म्हंटलं की प्रथम इमारत व क्रीडांगण आलेच पण ज्या शाळेला फक्त वर्गखोल्याच आहेत परंतु मैदानाचा अभाव आहे अन मनात स्वप्न आहे की,विध्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करून दाखवायची.अशा वेळी काहीतरी केलेच पाहिजे आणि शांत बसून स्वप्न पुर्ती कशी होईल मग?या विचारातून प्रस्तुत शाळेचे मु.अ.यांनी स्वतः पुढाकार घेऊन गावची हागणदारी व उकिरडा असलेली जागा शाळेचे शिक्षकवृंद व शा व्य समितीच्या मदतीने साफ केली.. या टीमची तळमळ बघून गावातील तरुणांनी मदत केली अन तिथे लाल माती अंथरूण प्रत्यक्ष खेळांची सुरुवात केली त्याची फलश्रुती म्हणजे या शाळेची 14 वर्षाखालील मुलींचा संघ 2018-19 ला नांदेड जिल्हा उपविजेते पदापर्यंत पोहचले पण इथे थांबून जमणार न्हवते या वर्षी पुन्हा प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांनी नांदेड जिल्हा विजेतेपद मिळवले ते नशिबाने न्हवे तर दररोज तासनतास मैदानावर घाम गाळून. तसेच हाच संघ पुढे विभागावर तृतीय क्रमांकावर राहिला. खो -खो सोबतच 100 मी धावणे,200मी धावणे, गोळाफेक, रिले रेस या प्रकारात येथील विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धेत अनेक पदकं मिळवली. विशेष म्हणजे या वर्षी घेण्यात आलेल्या गो-गर्ल गो स्पर्धेत या शाळेची विद्यार्थिनी कु जना गणेश डिकळे हिने विभागावर 100 मी धावणे प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला व बालेवाडी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाली. गुणवत्तापूर्ण शिक्षण विध्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे या भावनेतून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळेची टीम अहोरात्र मेहनत घेत आहेत त्यात विद्यार्थ्यांचे मराठी वाचन, इंग्रजी वाचन, गणिती क्रिया, विविध प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग करून घेतले जातात एवढेच न्हवे तर दररोज सकाळी शाळेच्या
वेळेव्यतिरिक्त शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा अनुषंगाने त्यांची तयारी करून घेतली जाते.शिक्षणातून सर्वांना समान संधी प्रदान होईल असे नियोजन केले जाते व अभ्यासात गतिमंद असलेल्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष दिले जाते. दर शनिवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ग्रंथाचे वाचन घेतले जाते व त्या पध्दतीचे सुसज्ज वाचनालयाची निर्मिती शाळेत करण्यात आली आहे. हरित परिसर माणूस ही प्रजाती जगवायची असेल तर वृक्ष लागवड महत्वाची आहे त्यातून पर्यावरण संरक्षण होईल छात्रो के मन की यह अभिलाषा है;पेड बोलते सुंदर स्वास्थ्य की भाषा है! या उक्तीप्रमाणे मागील वर्षांपासून शाळेत व परिसरातील शेतीबांधावर वृक्ष लागवड करण्यात आली. नांदेड जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अशोक काकडे साहेब यांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन नुसती झाडे लावली नाहीतर ती टिकवून ठेवली आहेत. त्या झाडांना संरक्षक जाळी ,ठिबक सिंचनद्वारे पाण्याची सोय करण्यात आली आहे व त्याची जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्यात आली. ‘झाडे वाचवा,माणूस जगवा ‘या विचाराप्रमाणे विद्यार्थी झाडांचे रक्षण करीत आहेत. संपूर्ण परिसर सुंदर फुलांनी नटलेला देखावा शाळेत प्रवेश केल्यानंतर मनाला मोहवून जातो. नाविन्यपूर्ण परिपाठ सकाळची शाळेची सुरुवात नादमय व ज्ञानपूर्ण परिपाठाने होते त्यासाठी ग्रा पंचायत कार्यालयाकडून शाळेस साउंड सिस्टीम पुरवण्यात आले असून विद्यार्थी सूचनेवरून आप-आपल्या जागेवर दररोज सुचनेची वाट न बघता थांबतात त्यासाठी शाळेच्या परिसरात गोल रिंगणाच्या जागांचे रंगकाम केले आहे त्यामुळे वेळेची बचत होऊन विद्यार्थी लवकर रांगेत उभे राहून त्वरित परिपाठ सुरू होतो. विद्यार्थी परिपाठ संचलन स्वतः करतात, त्यात राष्ट्रगीत, प्रतिज्ञा,संविधान प्रास्ताविका वाचनानंतर विविध गीते, प्रार्थना,दिनविशेष, बोधकथा, सुविचार, प्रश्नमंजुषा,कवितेवर आधारित समुह नृत्य,विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरा करणे,व्यक्तिविशेष,ज्या इयत्तेचा परिपाठ त्या इयत्तेतील प्रत्येक विद्यार्थी इंग्रजी शब्द व त्यांचे मातृभाषेतून अर्थ सांगतो,अवांतर वाचन उपक्रमात वाचलेल्या ग्रंथाचे सार विद्यार्थी कथन करतात यासारख्या बाबींचा समावेश करून सुंदर परिपाठाचे सादरीकरण केले जाते.या प्रसन्न सकाळी शेताकडे जात असलेली माणसे शाळेचा परिपाठ बघितल्याशिवाय जात नाहीत इतकी सवय त्यांना झाली आहे. हम तो किसान खेतो में अनाज उगाते है,लेकीन कार्य करने की प्रेरणा तो बच्चे की आवाज दे जाती है! अशी भावना तर त्यांच्या मनात घर करून गेली नसेल ना? सांस्कृतिक तयारी भारत देशाला प्राचीन काळापासून महान संस्कृती लाभली आहे व त्याची बीजे आम्हाला आज पण पहावयास मिळतात. विद्यार्थ्यांना लहानपणीच जर या बाबींची जाणीव करून देऊन त्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून उभारणी करण्यात येत आहे.त्यासाठी राष्ट्रीय सणांना व विविध समाजसुधारकांच्या जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा,त्यांच्या जीवनावर आधारित लेखन स्पर्धा, गितगायन सारख्या स्पर्धा घेतल्या जातात. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय बहारदार असतो.या वेळी गावातील कुठल्याही घरात एकही व्यक्ती आढळणार नाहीत तर शाळेतील चिमुकल्या जीवांना प्रेरणा देण्यासाठी कार्यक्रम स्थळी आपली उपस्थिती लावतात. या सोबतच शाळेचे लेझीम पथक व बँड पथकाची निर्मिती करण्यात आली असून अगदी 2 री व 3 री चे विद्यार्थी बँड नादमय तालावर वाजवतात. शाळेच्या लेझीम पथक व बँड पथकाची कला ज्यांनी ज्यांनी बघितली ते सर्वजण अचंबित होतात. एवढेच कशाला हे बघून लोहा तालुक्यातील इतर शाळासुद्धा असे पथक स्थापन करण्यास उत्सुकता दर्शवित आहेत. इतर उल्लेखनीय बाबी शाळेची होत असलेली प्रगती पाहून माझी सैनिक उद्धव पा डिकळे यांनी शाळेस प्रत्येक वर्गात व्हाईट बोर्ड दिले आहेत, माझी सैनिक संजय गायकवाड यांनी कार्यालयात सोफा खुर्च्या दिल्या आहेत, माधव पवार यांनी बसण्याची सोय व्हावी म्हणून खुर्च्या दिल्या असून, काहींनी झाडांना संरक्षण जाळी दिली आहे. विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रातील चमक पाहून गावकऱ्यांनी शाळेस एक एकरचे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी कंबर कसली आहेच.अगदी नाट्यगृहात शोभेल असे स्वच्छतागृह बांधण्यात आले असून सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी सोलार पॅनल बसवण्यात आले आहे.शिवाय लोकसहभागातून सांस्कृतिक मंच बांधण्याचे प्रस्तावित आहे.येथील शिक्षक टीमने जो गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विडा उचलला आहे तो नक्कीच येणाऱ्या काळात पूर्ण होईलच तशी खंबीर साथ त्यांना शा व्य समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव डिकळे व गावकऱ्यांची आहे. तसेच केंद्रप्रमुख श्री बाबुराव फसमले,ज्येष्ठ शि वि अ श्री सर्जेराव टेकाळे, पं. स. लोहाचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री सोनटक्के रवींद्र साहेब, गटविकास अधिकारी श्री फंजेवाड साहेब यांचे बहुमोल मार्गदर्शन शाळेस लाभत असून आता येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून ‘व्हर्चुअल क्लासरूम’द्वारे बालभारती,पुणे येथुन शाळेतील विध्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. शेवटी पारडी शाळेची प्रगती होत असलेली पाहून एवढेच म्हणता येईल की, थम सा जाता है जो तुफान उसे कोई डरता नहीं,काबिलियात हो अगर आपमें तो कोई तुफान आपको डराता नहीं..

शब्दांकन- बालाघाटे देविदास प्रकाश

प्रा. पदवीधर जि प प्रा शाळा पारडी ता. लोहा जि.नांदेड