सा.बां. उप विभागाचे वरीष्ठ लिपीक उत्तम कुलकर्णी सेवानिवृत्त

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड: प्रतिनिधी

येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे वरिष्ठ लिपिक उत्तम बाबुराव कुलकर्णी हे दि. ३० एप्रिल रोजी ३८ वर्षे येवढ्या प्रदिर्घ सेवेनंतर, सेवानिवृत्त होत आहेत.

उत्तम कुलकर्णी हे यापूर्वी किनवट, नायगाव, बिलोली, देगलूर येथे उत्कृष्ट कार्य केले आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल तत्कालीन कार्यकारी अभियंता पी. वाय. देशमुख यांनी त्यांना एक आगाऊ वेतनवाढही दिली होती. उत्तम कुलकर्णी यांनी मुखेड येथील सा. बां. उपविभागात सर्वात जास्त सेवा बजावली. प्रत्येक अधिकाऱ्याचा त्यांनी विश्वास संपादन केला .

 

त्यांच्याकडे रागात आलेल्या व्यक्तीस थंड करण्याची उपजत कला असल्यामुळे अत्यंत क्लीष्ट असा विभाग हासत खेळत सांभाळला. निष्कलंक वरीष्ठ लिपीक म्हणेन त्यांचा या विभागात परिचय होता. त्यांचा कार्यकाल पत्रकारांसाठी अविस्मरणीय राहीलेला आहे. उत्तम कुलकर्णी यांचा सर्वपक्षीय मित्रवर्ग आहे हे विशेष. त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल माजी आ. कर्मवीर किशनराव राठोड, आ. डॉ. तुषार राठोड, माजी. आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे, माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, माजी उपनगराध्यक्ष भाई श्रीराम गरुडकर, सुप्रभातचे अध्यक्ष अनिल कोत्तावार, सचिव लक्ष्मण पत्तेवार, दादाराव आगलावे, जिप्सीचे अध्यक्ष शेखर पाटील यांच्याह अनेकांनी अभिनंदन केले आहे. सेवानिवृत्तीनंतर उत्तम कुलकर्णी यांनी सुप्रभात मित्रमंडळात येण्याचा मनोदय व्यक्त केला. कुलकर्णी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.