कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार संजय नागमवाड यांच्या कार्यवाहीमुळे वाळू माफीयांचे धाबे दणाणले…

नांदेड जिल्हा मुदखेड

 दोन ब्रास अवैध रेती वाहतुक करणारे टिप्पर पकडून केली दंडात्मक कार्यवाही

मुदखेड : रुखमाजी शिंदे

कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी चालू असताना सुध्दा मुदखेडात अवैधपणे वाळूची वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळताच कर्तव्यदक्ष नायब तहसिलदार संजय नागमवाड यांच्या पथकाने एक टिप्पर अवैधपणे वाळूची वाहतूक करीत असलेले पकडून तहसिल कार्यालयात कार्यवाहीसाठी आणले आणि दंडात्मक कार्यवाही केली यामुळे वाळू माफीयांचे धाबे दणाणले गेले आहे.

तालुक्यातील वाळूचे सर्व ठेके बंद असतांना सुध्दा काही ठिकाणाहून रात्री- मध्यरात्रीला अवैधपणे वाळूची वाहतूक करीत असल्यामुळे मुदखेडात अवैधपणे वाळू वाहतुक होत असल्याची माहिती मिळताच तहसिलदार संजय नागमवाड हे आपल्‍या तस्‍कर विरोधी पथकासमवेत जाऊन मुगट परिसरात एक टिप्पर एमएच २६ एडी १२५४ दिसले त्‍याची विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे व कागदपत्रे पहावयास मिळाले नसल्‍याने सदरील टिपर तहसिल कार्यालयात कार्यवाहीसाठी आणले आहेत.

हे टिप्पर गणपती घोगरे (सिडको नांदेड) येथील आहे. सदरील टिपर सिडको नांंदेड या भागातून मुगट,माळकाैठा,वासरी,आमदुरा परिसरात अवैधपणे दोन ब्रास वाळूची वाहतूक करत असताना आढळून आलेले आहेत.सदरील टिपर मालकांकडून दंडारूपी एक लाख चार हजार रूपये दंड आकारण्‍यात आल्याची माहिती नायब तहसीलदार संजय नागमवाड यांनी दिली. नागमवाड यांच्या संंविधानिक भूमिकेचे आणि कर्तव्यदक्ष कार्याचे या भागातील शेतकऱ्यांना स्वागत केले असून वाळू माफियाांचे धाबे दणाणले आहे.

यापुढे तालुक्यातील वाळू माफियांचे दाट विणलेले गेलेल्या जाळ्याचा नायनाट करण्यासाठी वरिष्ठांची कायम साथ मिळाली तर यापुढेही अधिक जोमाने मोठ्या कार्यवाह्या करण्यासाठी मी आणि माझे महसूल पथक सज्ज असल्याचे मत संजय नागमवाड याांनी व्यक्त केले आहे.