लॉकडाऊनमुळे बाऱ्हाळीत अडकलेल्या परराज्यातील 40 कलावंतांना थेट विदेशातुन मदत ………उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांच्या हस्ते धान्य वाटप

ठळक घडामोडी महाराष्ट्र

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन 3 मे पर्यंत केला असुन या लॉकडाऊनला एक महिणा पुर्णही झाला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी व कुटुंबाचा उदर्निवाह चालविण्यासाठी झारखंड, कर्नाटक,छत्तीसगड येथील 40 कलावंत मुखेड  तालुक्यातील बाऱ्हाळी येथे अडकलेले असताना अमेरीकतील सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले मंदार जोशी यांनी उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांच्या हस्ते उपजिविकेसाठी लागणारे सर्व धान्य साहित्य दिले.

देगलुर येथे कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांनी त्यांचे अमेरीकेतील मित्र मंदार जोशी यांच्याशी फोनवर  संवाद साधत असताना भारताताील कोरोना विषाणुमुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीवर बोलत होते . मुखेड सारख्या ग्रामीण भागात सर्कस चालविण्यासाठी आलेल्या झारखंड, छत्तीसगड व कर्नाटक येथील भयानक परिस्थितीचे वास्तव मित्र मंदार जोशी यांना उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांनी सांगितले.

मागील एक महिण्यापासुन मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथे सर्कस चालविण्यासाठी आलेले परराज्यातील 40 नागरीक अडकल्याने त्यांना उपासमारीची वेळ आली. रोजगार बंद असल्याने किराणा सामानासाठी पैसा ही नाही….गरीबी परिस्थिती असल्याने काम करावे तेंव्हा खावे अशी परिस्थिती असल्याने बाऱ्हाळीत  आले अन लॉकडाऊन लागले.

परराज्यातील सर्कस कलावंताची परिस्थिती देगलुरचे उपविभागीय अधिकारी शक्ती यांनी पाहिली असता मुळचे सोलापुरचे असलेले अमेरीकेत वास्तव्यास असलेले मंदार जोशी यांच्याशी संवाद साधत असताना येथील परिस्थितीवर  बोलले  मंदार जोशी यांनी क्षणाचाहि  विलंब  न  करता या कलावंतांना मदत देऊ केली अन उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांच्या हस्ते कलावंतास दि. 27 रोजी धान्य वाटप केले.


   भारतीय नागरीक कितीही दुर गेला असला तरी त्याचे मातृभूमिशी असलेले प्रेम कधीही विसरु शकणार नाही यावरुन दिसुन येते. कलावंतांना मदत मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य आले.


मंदार जोशी सॉफ्टवेअर इंजिनियर , सोलापूर