नांदेड जिल्ह्यात 1 हजार 15 संशयितांची झाली नोंद घेण्यात आलेले 737 नमुन्यांपैकी 677 जण निगेटिव्ह ;

ठळक घडामोडी नांदेडच्या बातम्या

53 जणांचा अहवाल प्रलंबित तर आज पर्यंत दोन कोरोना रुग्ण पॉझीटिव्ह   

नांदेड :-कोरोना विषाणु संदर्भात आज सोमवार 27 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकुण 1 हजार 15 संशयितांची नोंद झाली आहे. यापैकी घेण्यात आलेले स्वॅब एकुण 737 आहेत, त्यापैकी 677 निगेटिव्ह असून 53 स्वँब अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण 5  स्वँब तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे.

आतापर्यंत एकूण घेण्यात आलेले स्वँब 737 असून त्यापैकी 2 रुग्णांचा स्वँब पॉझीटिव्ह आढळला आहे. हे रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारासाठी दाखल आहेत.
नांदेड शहरातील पिरबुऱ्हाणनगर येथील रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल बुधवार 22 एप्रिल 2020 रोजी प्राप्त झाला आहे.  या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व दमा यासारखे गंभीर आजार असल्यामुळे प्रकृती गंभीर आहे. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण 80 व्यक्तींचे स्वँब घेण्यात आले, या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

नांदेड शहरातील अबचलनगर येथील रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल रविवार 26 एप्रिल 2020 रोजी प्राप्त झाला असून या रुग्णाची प्रकृती स्थीर आहे. तसेच त्याचा निकटवर्तीय संपर्कातील 16 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असून तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता कोणत्याही अफवावर विश्वासु ठेवु नका, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.