जखमी हरणाला औषध उपचार करुण दिले जीवदान      सपोनि अदित्य लोणीकर यांनी उपचार वन्य विभागाच्या केले  स्वाधीन   

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड  : प्रतिनिधी

उन्हाचा पारा वाढल्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येत आहेत.असाच एक हरणाचा कळप मरखेल गावात आला असता गावातील कुत्र्यानी एका हराणाच्या पिल्लावर हल्ला केला असता यांच्या तावडीतून सपोनि अदित्य लोणीकर यांनी जखमी हरणाची सुटका करुण त्याच्यावर उपचार करुण जिवदान देऊन वन्य विभागाच्या स्वाधीन केले.

ऐकीकडे कोरोणा महामारीने नुसता थैमान घातल्यामुळे यावर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र व राज्य शासन संचार बंदी लागु केल्याने प्रशासन मोठे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे.तर शेतकरी पेरणी पुर्व शेती मशागातीच्या कामात व्यस्त आहेत.
उन्हामुळे मरखेल परिसरातील नदी , नाले कोरडे ठाक पडल्याने पाण्या अभावी वन्यप्राण्याचे प्रचंड हाल होत आहेत.यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत येत आहेत.असचा एक हरणाचा कळप मरखेल गावात आले असता गावातील कुत्र्यानी त्यांच्या वर हल्ला करीत असताना कळपाती मोठी हरणे शिवारात पळून गेले व नजर चुकून एक हरण गावत राहिल्याने सात ते आठ कुत्र्यानी हरणावर हल्ला करुण जखमी केले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली.
तात्काळ सपोनि अदित्य लोणीकर घटनास्थळी येऊन जखमी हरणाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवून त्या जखमी हरणारवर औषध उपचार करुण जिवदान दिले.नंतर हे हरण वन्यविभागाच्या कर्मचाऱ्याकडे स्वाधीन करण्यात आले.पाण्याअभावी वन्यप्राण्याची  होणारी गैरसोय लक्षात घेता जंगलात पाणवटे सुरु करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.