मुखेडात वैद्यकीय संस्था व इंडियन मेडिकल असोसिएशन वतीने 200 निराधार कुटुंबांना धान्य किट देऊन आधार

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड  : संदीप पिल्लेवाड
एक महिना झाला लॉकडाऊन आहे अनेकांच्या घरच्या चुली बंद. मुखेडमधील खाजगी डॉक्टर कोरोनाच्या या भयंकर काळात वैद्यकीय सेवा देत देत सामाजिक वसा घेऊन  वैद्यकीय संस्था मुखेड व इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.) च्या वतीने 200 कुटुंबांना धान्याच्या किट देऊन त्यांना कठीण काळात आधार देण्याचे काम तहसील कार्यलयात दि 26 रोजी करण्यात आले.
    डॉक्टर बांधवांच्या वतीने प्रधानमंत्री सहायता निधी (कोव्हीड १९) साठी २ लाख रुपये संकलीत करुन निधी देणार असल्याचे सांगण्यात आले.
       यावेळी गणाचार्य मठाचे विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, आ.डाॅ.तुषार राठोड, नगराध्यक्ष बाबूराव देबडवार,  पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर, मुखेड भुषण दिलीपराव पुंडे, डाॅ.अशोक कौरवार, डाॅ.
व्यंकटराव सुभेदार, डाॅ.रामराव श्रीरामे, डाॅ.शेख फारुक अहमद, डाॅ. पांडुरंग श्रीरामे, डाॅ.आर.जी.स्वामी, डाॅ.एम.जे.इंगोले, डाॅ.अविनाश पाळेकर, डाॅ.श्रावण रॅपनवाड, डाॅ.रणजित काळे, डाॅ.वीरभद्र हिमगीरे, डाॅ.राहुल मुक्कावार, डाॅ. शैलेंद्र कवटीकवार, डाॅ. पृथ्वीदास पत्की, डाॅ.प्रल्हाद नारलावार, डाॅ. तौसिफ परदेसी, डाॅ. विठ्ठल शेटवाड, आदी उपस्थित होते.