महाराष्ट्रातून तेलंगणात घरी जाण्यासाठी निघालेले 30 तरुण तरुणी पोलिसांच्या ताब्यात मदनुर चेकपोस्टवर पकडून लातूर पोलिसांच्या स्वाधीन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुक्रमाबाद  : प्रतिनिधी

लॉक डाऊनमुळे लातुर येथे कृषी कंपनीच्या मार्केटींगचे प्रशिक्षण घेणारे तेलगंणातील 30 तरुण-तरुणी आपल्या घराकडे जाण्यासाठी भर उन्हात आडमार्गे पायी चालत मिळेल त्या वाहनाने निघाले होते. सीमावर्ती भागात मदनूर चेक पोस्ट आलेल्या माहितीवरून या 30 जणांना देगलूर पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेऊन मुक्रमाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले.

यानंतर मुक्रमाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी या तरुणांना आयशर टेम्पोने परत पोलीस संरक्षणात लातुर येथे पाठवून तेथील प्रशासनाला कळविण्यात आले आहे. सध्या राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रशासनापुढे एक संकटच उभे राहिले आहे. याला रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे वैद्यकीय विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून तर संचार बंदीचे अंमलबजावणी काटेकोरपणे होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून तेलगंणातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात तरुण, तरुणी लातुर येथे कृषी कंपनीच्या मार्केटींगचे प्रशिक्षण घेत आहेत. पण कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे सर्व शैक्षणिक क्षेत्रातील संबंधित विभाग काही कालावधीसाठी राज्य शासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉक डाऊनमुळे अडकलेले व लातुर येथे प्रशिक्षण घेणारे 30 तरुण- तरुणी आपले गाव गाठण्यासाठी भर उन्हात आडमार्गे पायी चालत निघाले होते. शनिवारी हे तरुण देगलुरपासून जवळच तेलगंणा सीमावर्ती भागातील मदनुर चेक पोस्टवर आले असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून देगलुर पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेऊन मुक्रमाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी चौकशी करुण या तरुणांना एका वाहनातून पोलीस संरक्षणात लातुर येथे पाठवून देण्यात आले. लॉक डाऊनमुळे आता आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आमची उपासमार होत आहे. तरी प्रशासनाने आमची राहण्याची व जेवण्याची सोय करावी. अन्यथा आम्हाला तेलगंणात जाण्याची परवानगी द्यावी, असे प्रशिक्षण घेणाऱ्या तरूणांनी सांगितले आहे