देगलूर पोलिसांकडून गावठी दारू आडयावर धाड

देगलूर नांदेड जिल्हा

देगलूर : विशाल पवार

कोरोनामुळे लॉकडाऊन काळात मद्य विक्रीला शासनाकडून बंदी घालण्यात आली आसूनही तालुक्यातील काही जणांनी गावागावात याचा फायदा घेत हातभट्टी विक्री सुरू केली आहे.त्याच बरोबर ही गावठी दारू आवाच्या सव्वा दामाणे विकली जात आहे.

शौकिनांना कोरोनाची कुठलीही भीती दिसत नाही. म्हणूनच ग्रामीण भागात खेड्यामध्ये एकाच ग्लासने गावठी दारू पितांनाही दिसत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासन दखल घेत आहे. यामध्ये पोलिस प्रशासन व्यस्त असल्याचे पाहून तालुक्यातील अनेक गावांमध्ये गावठी दारूचा सुळसुळाट माजला आहे. याची भनक देगलूर पोलिसांना लागताच पोलीस उपनिरीक्षक ठाकूर यांच्या टीमने कु.शा. वाडी तांडा येथे अवैध गावठी दारूच्या हातभट्टीवर धाडी घातल्या. त्यात गावठी दारूचा साठा नष्ट करण्यात आले व सदर आरोपीविरुद्ध देगलूर पोलिसांनी कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक ठाकूर यांनी सांगितले.