स्वस्त धान्य दुकानात घुसून दुकानदारासह महिलांना मारहाण करणाऱ्या बारा आरोपी विरुद्ध अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

कंधार नांदेड जिल्हा

कंधार : प्रतिनिधी 

कंधार तालुक्यातील कारतळा येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानदारावर धान्य वाटप करत असताना गावातील काही आरोपींनी हल्ला करत  E-POS मशीन फोडून धान्य फेकून दिले.व जातीवाचक अश्लील शिविगाळ केल्याने दत्ता गायकवाड यांच्या फिर्यादी वरून बारा जनाविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात  अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंधार तालुक्यातील कारतळा येथील दत्ता लक्ष्मन गायकवाड यांच्याकडे शासकीय स्वस्त धान्य दुकान आहे. ते त्यांच्या दुकानात दि.20 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता स्वस्त धान्य वाटप करीत असताना गावातीलच पंडित निवृत्ती कदम, अनिल विश्वाम्बर कदम,विश्वाम्बर मोतीराम कदम, नागेश पंडित कदम,तेजेराव विश्वाबर कदम, परमेश्वर मधुकर कदम, व्यंकटी धोंडिबा कानघुले, मधुकर लक्ष्मण कदम, नागेश अप्पराव कदम, हणमंत निवृत्ति कदम,तुकाराम गोविंद कदम, अविनाश तुकाराम कदम यांनी माझ्या दुकानावर येऊन महारग्या तू लयी माजलास असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत मला लाता व काठ्यांनी मारहाण करत दुकानातील धान्य बाहेर फेकून दिले. माझ्या सुना सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही अश्लील शिविगाळ करत त्यांनाही मारहाण केली.


        गुन्हा घडून दोन दिवस झाले तरी कंधार पोलीस प्रकरणाची दखल घेत न्हवते.अखेर दि.24 रोजी सायंकाळी दत्ता गायकवाड   यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात वरील बारा जणांविरुद्ध कलम 143,147,148,149,323,354,427, अनुसुचित जाती जमाती अत्याचार कायदा 3(1)(r),3(1)(s) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने संबंधित भयभीत कुटूंबावर दहशतीचे वातावरणात निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे हे करीत आहेत.