गोर_गरीब जनतेला दिला निळू पाटलाने दिलासा

नांदेड जिल्हा हदगाव

हदगाव  : देवानंद  हुंडेकर 

संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही कोरोना या विषाणूने धुमाकूळ घातल्याने भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये निर्माण झाले या पार्श्वभूमीवर तामसा येथील निळू पाटील यांनी गोरगरीब जनतेला दिलासा देण्याचे काम सुरू केले लॉक डाऊन लागू करण्यात आल्याने ज्यांचे हातावरचे पोट आहे.

 

अशा व्यक्तींना शासनाचे राशन गहू-तांदूळ जरी येत असेल तरी हाताला काम नसल्याने खिशात पैसा नाही जीवनावश्यक वस्तू साखर ,तेल ,पत्ती, मिठ, चटणी ,घेण्याकरिता पैसे नाहीत हाताला काम नसल्यामुळे पैसा कुठून येणार अशा गरजू व्यक्तींना सामाजिक कार्यकर्ते सामान्य माणसाची जाण असणारा माणूस गेली 31 दिवस स्वतःच्या खर्चातून व काही लोकांच्या सहकार्यातून कोरोना या विषाणूला लढा देण्यासाठी गोर गरीब शेतमजूर अशा व्यक्तींना अन्नधान्याचा तुटवडा पडू नये म्हणून जीवनावश्यक वस्तू त्यांच्या घरापर्यंत पोहोचायचे कार्य गेली 31 दिवसांपासून निळू पाटील यांनी सुरू ठेवले