वाढदिवसाचा खर्च टाळून खाजा धुंदी यानी केले भटके व गरूजूंना शिरा खिचडीचे वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / प्रतिनिधी

मुखेड येथिल युवा कार्यकर्ते खाजा धुदीं यानी आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचे खर्च टाळुन पोलिस कर्मचारी,नगर पालिका कर्मचारी , स्थालांतरीत भटके मजूर व गरजुंना शिरा आणि खिचडी वाटप केले.

सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणुची परिस्थिती लक्षात घेऊन मुखेड येथील सामाजिक कार्यकर्ते खाजा धुंदी यांनी वाढदिवस साजरा करण्याचे टाळत मित्रमंडळा च्यावतीने गरजू लोकाना व कर्तव्यावर कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी, नगर पालिका कर्मचारी आणि पाल टाकून वास्तव्यास आसलेले भटके स्थालांतरीत मजूर, बाऱ्हाळी नाका, हिब्बट रोड, पोलीस चौकी,लोखंडे चौक,मधुर हॉटेल जवळील चेक पोस्ट वरील कर्तव्यावर असलेले कर्मचारी बांधव यांना शिरा आणि खिचड़ीचे वाटप करण्यात आले .

यावेळी प्रा व्यंकट बोईनवाड, सयद अब्दुल, गौस बागवान,पञकार बबलु मुल्ला,महेताब शेख,शादुल
होनवडजकर,भवानी चौहाण, गजानन पलकोंडवार, प्रा अखील येवतीकर, इम्रान पठाण, आमेर शेख यांनी पाल टाकून वास्तव्यास आसलेले भटके स्थालांतरीत मजूर, बाऱ्हाळी नाका, हिब्बट रोड,पोलीस चौकी,लोखंडे चौक,मधुर हॉटेल जवळील चेक पोस्ट वरील कर्तव्यावर असलेले कर्मचारी बांधव यांना खिचडी आणी शिरा वाटप करण्यात आले यादरम्यान खाजा धुंदी यांनी पाल टाकून असलेल्या स्थालांतरीत भटके मजूर यांच्या लहान मुलांना गोड शिरा भरवून वाढ़दिवस साजरा केला.