कोरोना मुळे नवं वधु-वरांची हळद रुसली … “विवाह सोहळे लांबणीवर”

नांदेड जिल्हा मुखेड

  कोरोना वधू वरा सह मंडप डेकोरेशन मंगलकार्यालय मालकांच्या मुळावर.

 

 बाराहाळी: पवन कँदरकुंठे
 जगात आणि देशात कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून या रोगावर अद्याप योग्य उपचार सापडला नाही. यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव थांबवणे हाच एकमेव उपाय असल्याने गर्दी टाळण्यासाठी देशात लाँकडाऊन करण्यात आले. जमावबंदी लागू करण्यात आली. एक महिना झाला देश व राज्यात लाँकडाऊन आहे पुढे किती दिवस राहील याची शास्वती नाही.
ऐन लग्नसराईत कोरोना विषाणू संसर्गजन्य रोग पसरला आहे.अशा काळात विवाह सोहळा पार पाडणे शक्य नाही.यामुळे अनेक वधू वरांच्या सोयरिकी होऊन ही कोरोना च्या लाँकडाऊनमुळे विवाह होने शक्य नाही. अनेकांच्या सोयरिकी मोडत आहेत तर अनेकांचे विवाह सोहळा लांबणीवर पडला जात आहे. कोरोनामुळे तयारीत असलेल्या वधू वरांच्या हळदी रुसल्या आहेत.या कोरोनाने वधू वरा बरोबर मंडप डेकोरेशन मंगलकार्यालय बँड बाजा धोडे स्वार आचारी अशा अनेकांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून कोरोना मुळावर आला असल्याची चर्चा सुरू आहे.
         दिवाळी नंतर हिंदु धर्मातील संस्कृती प्रमाणे तुळशीचे विवाह झाल्यानंतर प्रत्येक जण  आपल्या मुला मुलीच्या पसंतीचे विवाहासाठी स्थळ पहाण्यासाठी सुरुवात करतात पसंती नुसार रितिरिवाजाने सोयरिकी करून ठेवतात. आणी  उन्हाळा सुरू होताच  मुहूर्तावर विवाह सोहळा आयोजित करीत असतात या ही  वर्षी सर्व धर्मातील  शेतकरी  कष्टकरी यांनी आपल्या धर्माच्या परंपरेनुसार विवाहाच्या तारखा काढुन निमंत्रण पत्रीका वाटप केल्या मंगलकार्यालय बुक केले बँड बाजा लावला. वरातीसाठी घोडे ठरवले आचारी लावण्यात आले मंडप डेकोरेशन बुक करून ठेवले. या सर्वांना बुक करून सुपाऱ्या दिल्या विवाह सोहळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी लक्षात घेऊन त्यांची खरेदी केली सर्व तयारी करून ठेवली मुहूर्तानुसार वधू वर बोहल्यावर चढणार असे असताना जगभरात आणि देश व राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य रोगाणे थैमान घातले दिवसेंदिवस रोगाचा प्रादुर्भाव वाढत जात आहे या रोगावर योग्य औषधी उपलब्ध नाही या रोगापासून बचाव करण्यासाठी एकमेव गर्दी टाळणे स्वच्छ राहणे संपर्क टाळणे घरातच बसून आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घेणे हाच एकमेव पर्याय आहे यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशात 16 मार्च पासून लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतला त्यात वाढ करून तो 3 मे पर्यत करण्यात आला. या काळात जमावबंदी,संचार बंदी, लावली. विवाह सोहळ्या वर बंदी घातली मंदिर मजीत ची दारे बंद केली.  विमान रेल्वे बस खाजगी वाहतूक बंद करण्यात आल्या. जिल्हा सीमा बंदी केली  मंगलकार्यालय हाटेल लाँज बंद ठेवण्याचे आदेश दिले. अत्यावश्यक वस्तू चे दुकान वगळता सर्व बाजारपेठ बंद केली. आणि कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशा अवस्थेत विवाह सोहळे पार पाडणे शक्य नाही. कोरोना हा लग्न सराईतच पसरला आहे.
लाँकडाऊनच्या पूर्वी अनेक वधू वरांच्या विवाहाच्या तारखा काढण्यात आल्या निमंत्रण पत्रिका ही वाटप केल्या काहींनी विवाह साठी आवश्यक असणाऱ्या सामानाची खरेदी केली तर काही जण खरेदीच्या तयारीत होते अशातच कोरोना मुळे लाँकडाऊन करण्यात आले. यामुळे  मुहूर्तावर विवाह सोहळे होणे शक्य नसल्याने अनेकांचे लग्न लांबणीवर पडले तर अनेकांच्या झालेल्या सोयरिकी मोडल्या तर कायद्याचे पालन करीत मोजक्या लोकांनी घरात पाच लोकांत विवाह लावली.

 कोरोना मुळे वधू वरांच्या हळदी रुसल्या तर विवाह सोहळे लांबणीवर पडल्याने मंडप, डेकोरेशन, मंगलकार्यालय,बँड,आचारी,कापडदुकांनदार, सोने-चांदी चे व्यापारी या सारख्या व्यवसायिकाच्या मुळावर कोरोना आला आहे. वधू वरांची हळद रुसल्याने वधु-वर हिरमुसले आहेत.