अफवा पसरवु नका अन्यथा कारवाई करू – जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पिरबुर्र्हान नगरचा आढावा

नांदेडच्या बातम्या

नांदेड : प्रतिनिधी

नागरिकांना चुकीचे संदेश पाठवून गैरसमज पसरवू नका अन्यथा गुन्हे दखल करू असा इशारा जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी दिला आहे.

कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेल्या पिरबुर्हान नगर भागात आज जिल्हाधिकारी डॉ विपीन, पोलीस अधीक्षक मगर, म. न. पा. आयुक्त लहाने यांनी भेट देऊन त्या परिसरातील बंदोबस्ता ची पाहणी केली त्या नंतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवा पसरवू नये असे आवाहन डॉ विपीन यांनी केले आहे.

पीर बुऱ्हान परिसरात पूर्ण नाकाबंदी करण्यात आली आहे तसेच कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्वाना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे त्या मुळे इतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये संयम पाळावा असे आवाहन ही डॉ विपीन यांनी केले आहे.

सामाजिक माध्यमातून अनेक अफवा पसरवल्या जात असल्याच्या तक्रारी येत आहेत हा प्रकार थांबवा अन्यथा सायबर सेल कडून गुन्हे दखल करण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.