पालघर हत्याकांडप्रकरणी विहिंप व बजरंग दलच्या वतीने निषेध             दोषींवर कडक कार्यवाही करण्याची मागणी

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदीप पिल्लेवाड

देशाला हादरुन सोडणाऱ्या  पालघर येथील साधु संताच्या हत्येप्रकरणी मुखेड विश्व  हिंदु परिषद व बजरंग दलच्या वतीने तिव्र शब्दात निषेध व्यक्त करत तहसिल कार्यालयास दि २३ रोजी निवेदन दिले.

महंत स्वामी कल्पवृक्षगिरी व स्वामी सुशिल गिरी या संताची त्यांच्या वाहन चालकाची पालघर जिल्हयात गटचिंचले या गावाजवळ जमावाकडुन निर्घुन हत्या करण्यात आली. देशात लॉकडाऊन असताना एवढा जमाव एकत्र येऊन पोलिसासमोर असे हत्याकांड घडले असल्याने संत समाज भारत देशाच्या पावन भूमित असुरक्षित असल्याचे दिसते त्यामुळे सदरील घटनेचा निषेध व्यक्त करीत दोषींना तात्काळ अटक करुन कडक कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तहसिल कार्यालय मार्फत देण्यात आले.


           या निवेदनावर विश्व  हिंदु परिषदचे महेश मुक्कावार, संजय वाघमारे,बजरंग दलचे शंकर नाईनवाड,भाजपाचे किशोरसिंह चौहाण यांच्या स्वाक्ष­ऱ्या आहेत.