माधवराव पाटिल जवळगावकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा येथे दिली भेट

नांदेड जिल्हा हदगाव

हदगाव : देवानंद  हुंडेकर

कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी तामसा पी एच सी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन तेथील डॉक्टरांशी कोरोणा विषयी चौकशी केली.

कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रा.आ. दररोज पि एच सि प्रा आ केंद्र परिसरात हायपोक्लोराईड ने फवारणी केली जाते रुग्णांना साठी सोसिअल डिसटनसिंग चे मार्किंग केले आहे
रुग्ण दवाखान्यात प्रवेश करण्या अगोदर त्यांना हात धुण्यासाठी नळ व हँड वॉश ची सोय केली
कोरोना संशयित किंवा संक्रमित रुग्ण आल्यास त्यांच्यासाठी कोविंड 19 isolation वार्ड तयार करण्यात आले, त्यात दोन बेड च्या मध्ये पडदे लावण्यात आले व पूर्ण औषधी सह सज्ज असा वॉर्ड तयार केला आहे

दररोज क्वारंटाईन असलेले लोकांना भेटून त्यांची तपासणी केली जाते व मार्गदर्शन केले जाते
माधवराव पाटिल जवळगावकर यांनी डॉ. बोंदरवाड इनचार्ज वैद्यकीय अधिकारी, तामसा यांचे व सर्व टीम चे कौतुक केले