ग्रीन झोन नांदेड मध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण 

ठळक घडामोडी महाराष्ट्र
नांदेड जिल्ह्यात एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे खळबळजनक वृत्त हाती आले असून
नांदेड येथील एका भागातील व्यक्तीला या संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याचा अहवाल सकारात्मक आल्याने खळबळ उडाली आहे
विशेष म्हणजे एका भागातील 64 वर्षीय या आजाराची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले असून प्रशासनाची बैठक सुरू झाली आहे नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता मात्र काल पाठवलेल्या चाचणी नमुन्यांपैकी एकाला संसर्गजन्य आजाराची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले आहे प्रशासन अधिक दक्ष झाले असून यानिमित्ताने कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे
नांदेड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाने प्रचंड काळजी घेतली होती. यामुळे नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता. बुधवारी मात्र नांदेड शहरातील पीर बुऱ्हाणनगर भागात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने नांदेडवासीयांमध्ये थोडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या रुग्णाचे वय 64 वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे. पहिल्यांदा लॉकडाऊन घोषित केल्यापासून जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी जिल्ह्यातील परिस्थिती ही आखून दिलेल्या नियमांप्रमाणे काटेकोर पद्धतीने हाताळली होती. यामुळे जिल्ह्यामध्ये  आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता.
नांदेड जिल्ह्यातून मंगळवारी रात्री 8 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील एका एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भोसीकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो राहात असलेला संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आणि पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.