सुनील डोईजड यांची ॲण्टी कोरोना टास्क फोर्सच्या नांदेड सहाय्यकपदी निवड

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड  : प्रतिनिधी

कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांसाठी अनेक योजना सुरु करीत आहे. या योजनांचा लाभ गरजू लोकांपर्यंत पाहोचविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ॲण्टी कोरोना टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेतील  नांदेडच्या सहाय्यक पदी  सुनील  डोईजड  यांची  निवड  कामगार कल्याण परिषदेच्या अध्यक्षा भारती चव्हाण यांनी केली .

ॲण्टी कोरोना टास्क फोर्स (ACTF) ही स्वायत्त संस्था (Autonoums Body) सामाजिक क्षेत्रात देशभर कार्यरत आहे. देशातील बहूतांश राज्यात कोरोनाविषयी या संस्थेचे सामाजिक कार्य सुरु झाले आहे. राज्यातील 36 जिल्ह्यात व सर्व तालुक्यात आणि शहरात, गावपातळीवर एक पुरुष व एक स्त्री समन्वयक म्हणून स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. एसीटीएफचे अनेक स्वयंसेवक महाराष्ट्र व गोव्यासह इतर राज्यातही शासकीय यंत्रणेबरोबर खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.

या संस्थेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक खेड्यात गरजू नागरिकांपर्यंत संपर्क साधण्यात येत आहे. त्यांना संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फत जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, जेवण, मास्क, वैद्यकीय मदत, सॅनिटायझर, सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
तसेच कोरोना रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचा-यांसाठी पीपीई किट व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच कोरोना या आजाराविषयी जनजागृती करण्यात येत आहे. देशातील 70 टक्के जनता ग्रामीण व निमशहरी भागात आहे. त्यांच्याशी जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर ग्रामप्रमुखामार्फत समन्वय साधून सरकारच्या योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देण्यात येईल यासाठी ही संस्था कोणत्याही व्यक्ती वा संस्थांकडून मदत, देणगी घेणार नाही.
परंतू स्वयंसेवकांमार्फत जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी व त्याचा प्रत्यक्ष गरजू नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी मदत करील. सर्व राज्यात संस्थेचे काम सुरु झाले आहे.