मुक्रमाबाद महसूलात खुलेआम वाळु तस्करी… अधिकारी मात्र मुग गिळुन गप्प का ?

नांदेड जिल्हा मुखेड

बाराहाळी : प्रतिनिधी

संपुर्ण प्रशासन कोरोनाच्या विषयावर अत्यंत गंभीरपणे काम करत असताना मात्र मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद महसूल विभागात मात्र अवैध वाळुची तस्करी करण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत असुन, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी,राँयल्टी विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकार्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

 

जिल्ह्याधिकारी विपीन ईटनकर यांनी स्वतः अनेक ठिकाणी वाळु तस्करी विरूद्ध कार्यवाही केलेली आहे. एका बाजुस वाळुचे तराफे जाळले जात आहेत पण दुसऱ्या बाजूला म्हणजेच मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद महसुलातील बामणी,वळंकी मुख्य रस्त्यावरील तेरू व मुक्रमाबाद नदीच्या नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होताना चे चित्र दिसत आहे. नदीच्या नदी पात्रातील काही प्रमाणात पाणी आटल्यामुळे येथुन वाळु ऊपसा सहजरीत्या होऊ लागला आहे. याव्यतिरिक्त वाळुची चाळणी करून तिथेच पाण्याने धुतली देखील जात आहे. व तेथुन बिहारीपुर व डोरणाळी या गावामध्ये वाळुचा साठा केला जात आहे. महसुल खात्यातील संबंधीत तहसीलदार, गिरधावार,तलाठी, यांना सबब माहिती असताना सुद्धा मुग गिळुन गप्प का असा सवाल नागरींमधुन होत आहे. या अगोदर ही या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तोंडी व लेखी तक्रार सुद्धा केली होती मात्र या होत असलेल्या अवैध वाळू ला आळा बसलेला नाही. अधिकारी कोण्या कारणांमुळे गप्प आहेत या संदर्भात किमान या भागातील लोकप्रतिनिधींनी यांनी स्वतः होऊन लक्ष घालावे.

एका बाजूला संकटात सापडलेल्या परिस्थितीत मढ्यांवरच लोणी खाणारे कोण आहेत याचा तपास घ्यावा. यासंदर्भात याठिकाणी अधिकार्यांची मिलीभगत आहे का,जर नाही तर कार्यवाही का होत नाही,की उत्खनन विभाग व महसूल विभागाचे अधिकारी फार मोठी अर्थपूर्ण उलाढाल करत नाही ना अशी भिती व्यक्त केली जात असुन या प्रकरणात मानवतेच्या दृष्टिकोनातून तात्काळ लक्ष घालून अशा गंभीर संकटाच्या प्रसंगी जे चालु आहे ते थांबवावे अशा प्रकारची मागणी लोकांतून होत असुन लोकांच्या मागणी पेक्षा जिल्हाधिकार्यांनी स्वतः लक्ष घालून जर ही तस्करी नाही थांबवली तर या विभागातील तहसीलदार,गिरधावार, तलाठी यांना निलंबित करावे.