भविकांचा घोडा कुठे अडला? …. शीख भाविक लॉकडाउन मध्ये झाले त्रस्त !

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : प्रतिनिधी

नांदेड मध्ये जवळपास एक महिन्यांपासून लॉकडाउन मध्ये असलेल्या शीख भाविकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी गृहमन्त्रालयाने महाराष्ट्र शासनाला निर्देश पाठविल्याची माहिती केंद्रीय मंत्री श्रीमती हरसिमरत कौर बादल यांनी रविवार दि. 19-04-20 रोजी सोशल मीडिया वर वीडियो द्वारे दिली होती. वरील वीडियो मुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला होता आणि सोमवार पासून आपली घरवापसी आहे असे गृहीत धरुन त्यांनी तयारी सुरु केली होती. पण आज महाराष्ट्र शासनाने वरील विषयी मौन धारण केल्याने भाविकांची घोर निराशा झाली आहे. केन्द्राने परवानगी दिल्यानंतर आता भविकांचा घोडा कुठे अडला असा प्रश्न शीख समाजातुन विचारला जात आहे.

नांदेड मध्ये लॉकडाउन घोषणेनन्तर हजारोच्या संख्येत भाविक अडकून पडले. दि. 20 मार्च रोजी आलेले नरेन्द्र मोहन आणि त्यांची पत्नी हरजीत कौर हे वरील निर्णयामुळे बेजार झाले आहेत. त्यांची आठ वर्षाची मुलगी आजारी आहे व दिल्ली येथील दवाखान्यात उपचाराधीन आहे. अनेक भाविक पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान येथील आहेत.

ज्यांचे कुटुंब आणि शेती उघड्यावर आहे. वृद्धांच्या तबीयतीचा प्रश्न आहे. संतबाबा नरिंदर सिंघजी कारसेवा वाले, संतबाबा बलविंदर सिंघ जी कारसेवा वाले, गुरुद्वारा सचखंड बोर्ड अध्यक्ष, बोर्डाचे सदस्य, सेवाभावी नागरिक, पत्रकार रवीन्द्र सिंघ मोदी यांनी भाविकांचा मुद्दा वेळोवेळी प्रस्तुत केला. पंजाब येथून नेते मंडळीनी हा मुद्दा केन्द्रा पुढे प्रस्तुत केला. भाविकांना त्यांच्या घरी पाठविण्याविषयीचा आज मार्गी लागणार असे चित्र निर्माण झाले होते. परिवहन मंडळाने ही विशेष गाड्या सोडण्याची तयारी दाखवली असल्याने सर्व भाविक सुखरूप घरी परतणार असे सर्वाना वाटत होते. पण महाराष्ट्र शासन आणि विशेष करून नांदेड जिल्हा प्रशासनाने आज मौन धारण करून घेतले. मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश आल्यानंतर नांदेड जिल्हा प्रशासन पुढील करवाई करेल असे समजले. केन्द्राने आदेश दिल्याचे केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल हे बतावणी करीत आहेत काय? जर त्यांचं म्हणणं खरं असेल तर मग भविकांचा घोडा नेमकं कुठं अडला हे प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित केला जात आहे.


प्रयत्न सुरु आहेत : चव्हाण
राज्याचे सार्वजनिक निर्माण मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री श्री अशोकराव चव्हाण यांनी भाविकांना घरी पाठविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे म्हंटले आहे. पत्रकार रवीन्द्र सिंघ मोदी यांच्याशी फ़ोन वर झालेल्या सम्भाषणात श्री चव्हाण यांनी आश्वासन दिले की शासन लवकरच या विषयी तोडगा काढेल. आम्ही प्रयत्नशील आहोत असे ते म्हणाले.