खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वतीने अन्नधान्याचे किट वाटप

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड  : प्रतिनिधी

नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने भाजपा महानगराध्यक्ष प्रविणभाऊ साले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड  येथे  अन्नधान्य किटचे वाटप करण्यात  आले .

यावेळी  नांदेड मनपा विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत यांच्यासह  सराफा गाडीपुरा मंडळचे भाजपाचे पदाधिकारी दिपक शर्मा  यांच्या मार्फत मंडळ मधील शनिमंदिर जुना पुल येथील गरजूंना अन्नधान्य शिधाचे किट वाटप करण्यात आले.


        यावेळी नवामोंढा मंडळ अध्यक्ष नवल पोकर्णा , महानगर चिटणीस मनोज जाधव , नरेंद्र मोदी विचारमंचचे सोनु उपाध्याय, सत्तू महाराज, यांच्यासह  पदाधिकारी व कार्यकर्ते, गरजूं नागरीक उपस्थित होते.