आज संत गोरा कुंभार यांची पुण्यतिथी ; पुण्यतिथीनिमित्त लोकभारत न्यूजच्या वतीने विनम्र अभिवादन

इतर लेख संपादकीय

 संत गोरा कुंभार हे परंपरेने महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील गोरबा तेर म्हणून ओळखल्या जाणा सत्यपुरी गावात राहत होते.असे मानले जाते की ते नामदेव यांचे समकालीन होते. ते 1267 ते 1317 च्या दरम्यान सत्यपुरित राहत होती. गावात त्यांच्या नावावर एक छोटेसे मंदिर बांधले गेले आणि त्याचे भक्त पूजेसाठी येतात.

संत गोरा कुंभार ( गोरोबा म्हणूनही ओळखले जातात) हे भक्ती चळवळ आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाशी संबंधित हिंदू संत होते .गोरा कुंभार आणि इतर संतांनी अभंगांची शेकडो गाणी लिहिली आणि गायली (शब्द नष्ट होऊ शकत नाहीत). वारकरी संप्रदायाचे मुख्य तत्व म्हणजे दररोज कीर्तन करणे.

श्री संत गोरा कुंभार (इ.स. १२६७ ते १३१७)

तेरे-डोकी गावात गोरा कुंभार हा एक विठ्ठलभक्त होता. कुंभारकाम करतांना देखील तो पांडुरंगाच्या भजनात सदैव तल्लीन असे. पांडुरंगाच्या नामस्मरणात ते नेहमी मग्न असायचे.

एकदा त्यांची पत्नी आपल्या एकुलत्या एका लहान मुलास अंगणात ठेवून पाणी आणण्यासाठी गेली.त्या वेळी गोरा कुंभार मडकी करण्यास लागणारी माती तुडवीत पांडुरंगाचे भजन करीत होते. त्यात ते अगदी तल्लीन झाला होते. जवळच रांगत, खेळत असलेलं ते मूल तिकडे येऊन आळ्यात पडले.त्या मातीत आले.गोरा कुंभार पायांनी माती खालीवर करीत होता. माती बरोबर त्याने आपल्या मुलालाही तुडविले. पांडुरंगाच्या भजनात तो निमग्न असल्यामुळे तुडविताना रडलेले मूलही त्याला समजले नाही.

पाणी आणल्यावर त्याची पत्नी मुलास शोधू लागली.ते मूल तिला तिथे दिसले नाही, म्हणून ती गोरा कुंभाराकडे गेली.इतक्यात तिची नजर चिखलाकडे गेली, तो चिखल रक्तानेलाल झालेला पाहून मूल तुडविले गेल्याचे तिच्या लक्षात आले.तिने हंबरडा फोडला, आक्रोश केला. या नकळत झालेल्या कृत्याचे प्रायश्चित्त म्हणून गोरा कुंभारानेआपले दोन्ही हात तोडून घेतले. त्यामुळे त्याचा कुंभारकीचा धंदा बसला.विठ्ठल-रखुमाई मजूर बनून त्याच्या घरी येऊन राहू लागले.त्याचा तो कुंभाराचा धंदा पुन्हा बहरला.

पुढे काही दिवसांनी आषाढी एकादशी आली. ज्ञानेश्वर व नामदेव ही संत मंडळी पंढरपुरास निघाली. वाटेत तेरेडोकी येथे येऊन ज्ञानेश्वरांनी गोराकुंभार व त्याच्या पत्नीला पंढरपुरास आपल्याबरोबर नेले.

गरुड पारावर नामदेवांचे कीर्तन उभे राहिले. ज्ञानेश्वर आदिकरून सर्व संतमंडळी कीर्तन ऐकण्यास बसली. गोरा कुंभारसुद्धा आपल्या पत्नीसह कीर्तनास बसला.कीर्तनात लोकवर हात करून टाळ्या वाजवू लागले.विठ्ठलाचा गजर करू लागले; त्या वेळी गोरा कुंभारानेदेखील आपले थोटे हात भाविक पणे उचलले.तेव्हा त्या थोट्या हातांना हात फुटले.ते पाहून संत मंडळींना आनंद झाला.पांडुरंगाचा सर्वांनी जय जयकार केला.

गोरा कुंभाराच्या पत्नीनेश्री विठ्ठलाची करुणा भाकली.”पंढरीनाथा,माझे मूल पतीच्या पायाखाली तुडविले गेले;मी मुला वाचून दुःखी-कष्टी झाले आहे. विठ्ठला, माझ्यावर दया कर. मला माझे मूल दे.”पंढरीनाथाने तिची विनवणी ऐकली. तीचे चिखलात तुडवून मेलेले मूल रांगत रांगत सभेतून तिच्या जवळ येत असल्याचं तिन पाहिलं. त्या मुलाला तिने जाऊन उचलून कडेवर घेतले.संत मंडळींसह सर्वांनी आनंदा ने टाळ्यांचा गजर चालविला.अशा संत गोरा कुंभार यांच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन!