सामान्य शेतकरी सुपुत्राच्या पुढाकाराने,वृध्दाश्रमाला केली तीन क्किंटल अन्नधान्याची मदत.!

नांदेड जिल्हा मुदखेड

मुदखेड : रुखमाजी शिंदे डोंगरगांवकर

मुदखेड तालुक्यातील माैजे डोंगरगाव येथील एका सामान्य शेतकरी सुपुत्राच्या पुढाकाराने पुण्यातील वृध्दाश्रमास अन्नधान्याची मदत करत सामाजिक बांधिकीची जपवणूक केल्याबद्दल सर्वस्तरातून काैतुक होत आहे.

कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र संचार बंदी लागू आहे,यामुळे माैजे डोंगरगाव येथील सामान्य शेतकरी शामराव पा.व्यवहारे यांचे सुपुत्र अविनाश व्यवहारे हे रोजीरोटी करुन कुंटूबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुण्यातील एमआयडीसी भागामध्ये एका नामवंत कंपनीत जवळपास बारा ते पंधरा वर्षापासून कामगार म्हणून कार्यरत आहेत.परंतु कंपनीचे काम संपल्यानंतर सामाजिक कार्याची आवड असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून चाकण (पुणे) भागात त्यांनी वेगळी अोळख निर्माण केली आहे.

कुंटुबीयांचा उदरनिर्वाह करत असताना मी कामगार असलो म्हणून काय झाले,आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो,तसेच सामान्य परिस्थितीची जाणिव ठेवून राहत्या वस्तीतील मित्रांना एकत्र केले,आणि स्वतःच पुढाकार घेऊन पुण्यातील वृध्दाश्रमाला जवळपास तीन क्किंटल अन्नधान्याची मदत केली.

कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक संचारबंदी लागू असल्यामुळे गोरगरीब वृध्द,महिलांना कठीण समस्यांचा सामना करावा लागत आहे,आपल्या भागातील सर्वसामान्य वृध्द,महिला गोरगरीबांची अन्नधान्य वाचून गैरसोय होऊ नये,म्हणून पुढाकार घेऊन शेतकरी सुपुत्र अविनाश पा.व्यवहारे यांनी जवळपास तिन क्किंटल अन्नधान्याचे वाटप केले. द्वारका वृध्दाश्रमाने केलेल्या मदतीला तात्काळ धावून जात व्यवहारे यांनी पुढाकार घेऊन वृध्दाश्रमातील वृद्धांना तांदूळ १२० किलो,रवा ५० किलो,साखर ५० किलो,तेल ३० किलो, पोहे २५ किलो अशाप्रकारची मदत मित्रांनी एकत्र येऊन स्वतः च्या खर्चातून अन्यधान्याचा पुरवठा केला. अविनाश.एस.व्यवहारे यांच्यासह अनेक मित्रांनी वृध्दाश्रमातील वृध्दांना अन्नधान्याचे वाटप केले.

सामाजिक जाणिवेच्या भूमिकेतून हाती घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमांचे डोंगरगाव येथील शेतकरी,कामगार लोकप्रतिनिधी,पदाधिकारी आदिनी स्वागत केले आहे,वेळ प्रसंगानुरुप सामाजिक जाविवेच्या भूमिकेतून गरजूना मदत केली जाईल.गोरगरीब,कष्टकरी,शेतमजूर,कामगार,शेतकरी बांधव यांचा आर्शिवाद असाच पाठीशी रहावा,मी आपल्या परीने मदत करत राहील अशी ग्वाहीही या निमित्ताने लोकभारत न्यूजचे तालुका प्रतिनिधी रुखमाजी शिंदे यांच्याशी बोलताना अविनाश एस.व्यवहारे डोंगरगांवकर यांनी दिली.