सोशल डिस्टनची पायमल्ली ;कोरोनाला आंमत्रण

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड  : प्रतिनिधी

शासनाच्या देण्यात येणाऱ्या योजने अंतर्गत जनधन खाते ,मोफत गँसचे व किसान सन्मान योजनेची रक्कम जमा झाले की नाही पाहणे व उचलण्यासाठी सोशल डिस्टनची पायमल्ली करीत महीला ,वयोवृध्द शेतकरी दिवसभर उन्हात थांबून रोगाला आंमत्रण देत आहे.पण संबंधित बँकांना याचे कांहीच देणे घेणे नाही.

कोरोणा व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी यावर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र व राज्य शासनाने सुरुवातीला २१ दिवस लाँकडाऊन केले होते.पण कोरोणा संक्रमित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने पुन्हा ३ मे पंर्यत संचार बंदी लागू करण्यात आली आहे.कारण या रोगावर मात करयाचे असेल तर नागरिक ऐकमेकापासून दुर राहणे किंवा घरातच राहणे अती गरजेचे आहे.

अशा संकटकात अनेक महत्त्वपुर्ण व्यवहार ठप्प झालेच आहेत पण याचा फटका शेतकरी व मजुराना बसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे.यामुळे पंतप्रधान नंरेद्र मोदी यांनी पुढील तीन महिन्या करीता कांही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.यात मोफत धान्य व किसान सन्मान योजने अंतर्गत प्रति महिना दोन हजार रुपये ,मोफत गँस ,जनधन खात्यावर पाचशे रुपये असे अनुदान लाभधारकांच्या खात्यावर जमा केले आहेत.पण नागरिकांनी धीर न धरता हे पैसे जमा झाले किंवा नाही हे पाहण्यासाठी व उचलण्यासाठी आपले व दुसऱ्याचे जीव धोक्यात आणुन सोशल डिस्टींगचा फज्जा उडवीत बँकेत गर्दी करीत आहेत.

फक्त स्टेट आँफ इंडीया शाखा मुक्रमाबाचे शाखा व्यवस्थापक नवीन प्रजापती यांनी उन्हापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून बँके समोर टेंट उभारुन सोशल डिस्टींगचे तंतोतंत पालन करीत दररोज दिडीशे लाभधारकांना अनुदानाची रक्कम देण्यात येत आहे.हे अपवाद वगळता येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक व नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापकानी तर गलथान कारभाराचा कळसच गाठला आहे.
कारण कोणते नियोजन करण्यात न आल्याने दिवभर नागरिक ,महिला,वयोवृध्द शेतकरी पैसे उचलण्यासाठी दिवसभर उन्हात लाईन मध्ये थांबून सोशल डिस्टनची पायमल्ली करीत आहेत. तरी पण संबंधित बँकेकडून वेळेवर पैसे मिळत नसल्याने बाहेरून आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत आहेत.तरी प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.