मुखेडात संचारबंदी मोडून लग्न लावण्याचा प्रयत्न ; वधु – वरासह सात जनावर गुन्हा दाखल

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
देशभरात कोराना विषाणुमुळे लॉकडाऊन अन संचारबंदी लागू असूनही  मुखेड शहरात संचारबंदी मोडून विनापरवाना लग्न लावण्याचा प्रयत्न मुखेड पोलिसांनी हानून पाडला त्यात वधु – वरासह सात जनावर मुखेड पोलिसात दि. 19 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील मुखेड नगर परिषदच्या पाठीमागे लपुन लग्न लावत असल्याची माहिती मुखेड पोलीसांना मिळाली. पोलिसांनी आपली सुत्रे फिरवत घटनास्थळी तात्काळ जाऊन चौकशी केली असता शासनाकडुन कसल्याच प्रकारची परवानगी न घेता काही नातेवाईक एकत्र येऊन घरच्या घरी लग्न लावण्याचा प्रयत्न चालु होता पण पोलिसांच्या कार्यतत्परतेने लग्न थांबविण्यात आले.

यात खलील अहेमद शेख वय 60 वर्ष रा. नवरदेव यांचे वडील, रिहाना खलील शेख वय 45 वर्ष नवरदेवाची आई, इम्रान खलील शेख वय 22 वर्ष नवरदेव  तिघेही रा. खाजाबाबा नगर देगलुर, हसीना मियासाब सय्यद वय 40 वर्ष नवरीची आई, जब्बीन मियासाब सय्यद वय 20 वर्ष नवरी दोघेही रा. शारदा नगर, नांदेड, महमद मगदूम सय्यद वय 37 वर्ष नवरीचे मामा, राबियाबी अहेमद सय्यद वय 35 वर्ष नवरीची मावशी दोघेही रा. नगर पालिकेच्या पाठिमागे मुखेड यांना पोलिसांना विचारले असता घरातल्या घरात लग्न लावत असल्याचे पोलिसांना  सांगितले यात नांदेड जिल्हाधिकारी संचारबंदी सी.आर.पी.सी. कलम 144 मोडून लग्न लावत असल्याचे आढळून आले.

मुखेड पोलिस  उपनिरीक्षक गणपती चित्ते यांच्या फिर्यादीवरुन जिल्हाधिकारी यांचे संचारबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन मानवी जिवीतास धोका असलेल्या धोकादायक संसर्ग पसरविण्याची संभव असलेली हयगय कृती करत असताना मिळुन आल्याप्रकरणी भा.दं.सं. 1860 नुसार कलम 269 व महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1991 नुसार कलम 135 प्रमाणे गुन्हा सात जनावर गुन्हा नोंद करण्यात आला. याचा तपास पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर व पोउप निरीक्षक गणपती चित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोना व्यंकट जाधव हे करीत आहेत.


देशावर कोरानासारखे एवढे मोठे संकट असताना अनेकांना यांचे गांभीर्य राहिलेले नाही असे यावरुन दिसुन येते. लॉकडाऊन असल्याने कोराना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी देशातील पोलिस यंत्रणा, डॉक्टर्स, सफाई कामगार, प्रशासन काम करत असताना हा प्रकार घडणे म्हणजे कोरानाला आमंत्रण देणेच असल्याचे दिसुन येते.