डॉ. सुधाकर कोडगिरे यांनी सेवानिवृत्त वेतनातून पंतप्रधान सहाय्यता निधीस दिला ५१ हजार रुपयांचा धनादेश

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदीप  पिल्लेवाड

मुखेड शहरातील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर नागनाथराव कोडगिरे यांनी आपल्या सेवानिवृत्त वेतनातून पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५१ हजार  रुपयांचा धनादेश दिला.

यावेळी आ.डॉ.तुषार राठोड, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार,तहसीलदार काशिनाथ पाटील, मराठवाडा भूषण डॉ.दिलीप पुंडे, प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ.अशोक कौरवार, पोलीस निरीक्षक नरसिंग आकूसकर , पोलीस उपनिरीक्षक गणेश चित्ते, राम पत्तेवार, अशोक चौधरी, शंतनू कोडगिरे, धनंजय कोडगिरे,सागर कोडगिरे, राजु गंदपवाड, संतोष महेंद्रकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.