सावरमाळ येथे आले मुंबईहून २७ मजुर गावात ; परिसरात भीतीचे वातावरण

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड  : पवन  क्यादरकुंटे

राज्यात लॉकडाऊन तिव्र असातानाही सांगली व हैद्राबाद येथे अडकले मुखेड तालुक्यातील सावरमाळ येथील आठरा मजूर हे, गुरुवारी तेथून दुचाकीवर व गुरुवारी रात्री मुंबईहून ट्रकने नऊ असे २७ मजुर गावात आल्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले असून मंडळ अधिकारी एस.बी. मुंढे ,सपोनी कमलाकर गड्डीमे यांनी भेट देऊन त्यांना गावातील एका शाळेत तात्पुरते विलगीकरण करून ठेवले आहेत.

मुक्रमाबाद पासून जवळच असलेल्या सावरमाळ येथील सत्तावीस मजूराच्या हाताला कामच नसल्यामुळे कामाच्या शोधात हे मजुर आपल्या कुटुंबासह मुंबई,सांगली व हैद्राबाद येथे कामाला गेले होते. देशात सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानंतर हे, मजूर ज्या-त्या ठिकाणी अडकून पडले होते. एकीकडे दिवसागणिक कोरोना रुग्नाचा वाढत असलेला मृत्यूचा व वाढत्या रुग्नांचा आकडा हा भयभित करणारा असून शासन यावर आळा घालण्यासाठी राञ दिवस एक करत असून ज्या ठिकाणी मजूर व इतर नागरिक आडकले आहेत त्यांनी त्याच ठिकाणी राहावेत असे सांगत आहेत.

व त्यांच्या राहण्याची व खाण्याची सोय राज्य सरकारकडून करण्यात आलेली असतानाही सावरमाळ (ता.मुखेड) येथील हे, मजूर आपला व आपल्याला लेकरांचा जीव धोक्यात घालून आडमार्गाने राञीचा दुचाकीवरून प्रवास करीत हे, मजूर गावाकडं परतले आहेत. तर यापैकी हैद्राबाद येथून चार जण हे, मिळेल त्या वाहनाने व पायी आले. तर गुरुवारी रात्री मुंबईहून ट्रकने नऊ मजुर गावाकडं आले असल्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे.

त्यांना गावातील नागरिका पासून दूर ठेऊन त्याचे नमुने तपासणी तात्काळ करावी अशी मागणी गावातील नागरिकांनी शासनाकडे केली असून वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश गायकवाड यांनी मजुरांची तपासणी करुण हातावर शिक्के मारुण काळजी घेण्यास सांगितले यावेळी मंडळ अधिकारी साहेबराव मुंढे, सपोनी कमलाकर गड्डीमे,तलाठी शिवाजी तोत्रे,कृषी सहाय्यक डी.ए.भालेराव यांनी तात्काळ भेट देऊन त्यांना गावातीलच एका शाळेतील वेगवेगळ्या वर्ग खोल्यात विलगीकरण करून त्यांच्या खाण्याची व राहण्याची व्यवस्था केली आहे.याकामी सरपंच राम कुडदुले,विजय स्वामीसह गावकरी सहकार्य करीत आहेत.