मुखेडात खाजगी रुग्णालये लॉकडाऊनच्या काळातही देत आहेत अविरत सेवा

ठळक घडामोडी महाराष्ट्र

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

मुखेड सारख्या ग्रामीण भागात जीवाची परवा न करता लॉकडाऊनच्या काळातही खाजगी रुग्णालये अविरत सेवा देण्याचे काम करीत असुन अनेक तालुक्यात खाजगी दवाखने बंद अवस्थेत आहेत मात्र मुखेडमधील खाजगी रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मात्र जनतेचे सेवा करण्याचे काम चालुच ठेवले आहे.

नागरीकांना नेहमी उद्भवणारे ताप, सर्दी, खोकला असे आजार नेहमी असतात तर साप चावणे, ह्यदयविकार, शुगर, डोकेदुखी असे अनेक रुग्ण  खाजगी रुग्णालयात येत असतात. याचे निदान येथील डॉक्टर रोजच्या प्रमाणे अत्यंत काळजीपुर्वक करीत आहेत.

मुखेडभुषण डॉ. दिलीपराव पुंडे यांचे वय सध्या साठच्या वर आहे. या वातावरणातही अनेकांना त्यांनी जीवदान दिले आहेत. मागील आठ दिवसाच्या काळात 3 ते 4 रुग्ण हे साप चावलेले आलेले होते त्या रुग्णास रात्री बे रात्री उठूनही त्यांना आपल्या वैद्यकिय चिकित्सेच्या अनुभवाने मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले तर ह्यदयविकाराच्या अनेक रुग्णासही त्यांनी जीवदान दिले आहे .

शहरातील स्त्रीरोग तज्ञ डॉ. माधवी सुभेदार, डॉ. आरती चांडोळकर , डॉ. सौ. शारदा हिमगिरे, डॉ. सौ. शोभा उच्चेकर यांनी या कोरोना काळात दवाखाने चालु ठेऊन कार्य चालु ठेवले आहे. तर डॉ. व्यंकट सुभेदार,डॉ. प्रकाश पांचाळ, डॉ. कैलास चांडोळकर, डॉ. रंजीत काळे, डॉ. प्रशांत खंडागळे, डॉ. रामराव श्रीरामे , डॉ. उमेश पाटील, डॉ. राहुल मुक्कावार, डॉ. प्रल्हाद नारलावार, यांच्यासह अनेक वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्ससिंगचे भान ठेवून रुग्णांची सेवा करीत आहेत.


एकीकडे उपजिल्हा रुग्णालयात अनेक वैद्यकिय अधिकारी गैरहजर राहुन रुग्णांना नांदेड येथे जावे लागण्यास प्रवृत्त करीत असुन दुसरीकडे खाजगी डॉक्टर मात्र ग्रामीण भागातील नागरीकांना सेवा देत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात सर्व वैद्यकिय अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे व  तेथेही  रुग्णांची  योग्य  सेवा  व्हावी अशी मागणी जनतेतून होताना दिसत आहे.