तळेगाव येथे शालेय पोषण आहाराचे वाटप

नांदेड जिल्हा हदगाव

हदगाव : देवानंद हूंडेकर

हादगाव तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोशल डिस्टन चे पालन करीत कोविड-19(कोरोणा) संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मध्ये मा. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत आज 15 एप्रिल रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा स्तरावर शिल्लक असलेले पोषण आहार 329 विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येकी पहिली ते पाचवी दोन किलो तांदूळ सहावी ते आठवी तीन किलो तांदूळ व कडधान्य वाटप करण्यात आले .

 

यावेळी गावातील चेअरमन हनुमान गायकवाड शालेय समितीचे अध्यक्ष पंजाब नवले सामाजिक कार्यकर्ते चांदराव जगताप ,विठ्ठल जगताप, राहुल वाढवे,संतोष सोळंके, रोहिदास पांचाळ शाळेतील मुख्याध्यापक ईळेगावकर सर, सर्जे सर ,सूर्यवंशी सर, बोईनवाड सर, वाढोणकर सर, इत्यादी उपस्थित होते