मुखेडमध्ये कोरोनाच्या कामात कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी ग्रामसेवक निलंबित

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

    मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथील ग्रामसेवक

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

कोरोना विषाणु संदर्भातील उपाययोजनेच्या कामात कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी मुखेड तालुक्यातील उंद्री प दे येथील ग्रामसेवकास गटविकास अधिकारी यांनी निलंबित केले आहे.

कोरोना विषाणु आजाराबाबत मुख्यालयी राहुन ग्राम पंचायत क्षेत्रातील अडकलेल्या व्य्क्तींची माहिती न देणे, राज्याबाहेर अडकलेल्या ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील नागरीकांची माहिती न देणे,कोरोना आजाराच्या प्रतिबंधाकरीता एक दिवस आड हायफोक्लोराईड सोलुशनची फवारणी न करणे,इतर शहरातून आलेल्या नागरीकांचे कोरोना आजाराच्या लक्षणाच्या ग्राम  पंचायत स्तरावर जनजागृती न करणे, भ्रमनध्वनी बंद करुन ठेवणे,ग्रामसेवक आढाव बैठकीस गैरहजर राहणे, वरीष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे अशा बाबतीत ग्रामसेवक एस.व्हि. चौदंते यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करुनही असे प्रकरण चालुच असल्याने ग्रामसेवकास निलंबित करण्याचे आदेश गटविकास अधिकारी के.व्हि. बळवंत यांनी काढले.

भारतालाच नसुन तर जगाला कोरोना सारख्या भयंकर विषाणुने झपाटलेले असताना तालुक्यात ग्राम पातळीवर अशा प्रकारे ग्रामसेवकाचे वर्तन झाल्याने गावातील नागरीक आता राम भरोसे असल्याचे चित्र असुन अशा गैरवर्तनाने कोरोना कमी होण्याऐवजी त्यात भर पडल्यास याचा त्रास गावालाच नसुन तर संपुर्ण जिल्हयाला भोगावे लागेल. या निलंबनामुळे अनेक कामचुकार कर्मचाऱ्यात चांगला संदेश नक्कीच जाईल.