महाताळा येथील रेशन दुकानदाराची ग्राहकांना अरेरावी

नांदेड जिल्हा हदगाव

हदगाव  : देवानंद  हुंडेकर

हदगाव तालुक्यातील महाताळा येथील स्वस्त धान्य दुकानदार लाभधारकांना चढ्या दराने मालविक्री करतो याबाबत कुणी विचारणा केल्यास संबंधित ग्राहकाला माल दिल्या जात नाही उलट तुला काय करायचे ते कर अशी अरेरावीची भाषा हा दुकानदार करतो हा गैरप्रकार ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर चौकशीसाठी गेलेले सरपंच ग्रामसेवकासमक्ष ही या दुकानदाराने अरेरावी सुरूच ठेवली त्यामुळे या दुकानाचा पंचनामा ग्रामसेविका श्रीमती क्षिरसागर यांनी केला संबंधित तक्रार व या दुकानदाराचा पंचनामा हदगाव तहसील कडे करण्यात आली या पंचनाम यावर सरपंच व ग्रामसेवक यांच्यासह गावातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत