मुखेड काँग्रेसच्या वतीने नाभिक समाजास धान्य किट वाटप 

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड  / पवन  जगडमवार
       मुखेड शहर व तालूका काँग्रेसच्या वतीने नाभिक समाजातील हातावर पोट अवलंबून असणाऱ्या  गोर गरीब नागरिकास दि  १४ रोजी  धान्याचे किट वाटप  करण्यात  आले .
यावेळी  माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार,तहसीलदार काशिनाथ पाटील,शेषराव चव्हाण,पोलीस  निरीक्षक नरसिंग आकुसकर,शहराध्यक्ष नंदकुमार मडगूलवार,संतोष बोनलेवाड , जिल्हा प्रवक्ते दिलीप कोडगिरे,ता.ऊपाध्यक्ष ऊत्तमअण्णा चौधरी, डाॅ. श्रावण रॅपनवाड,नगरसेवक शाम एमेकर,नगरसेवक प्रा .विनोद आडेपवार,डाॅ.रणजीत काळे, पत्रकार किशोर संगेवार,जयप्रकाश कानगुले,मारोती घाटे,सुनील आरगिळे,आकाश कांबळे आदी  उपस्थित  होते .